ब्युरो टीम : 'भाजप सुरुवातीला छोटा पक्ष होता. सुरुवातीला या पक्षाचे केवळ दोनच खासदार होते. ही दोन खासदारांची संख्या दिवंगत माझे पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळात १८२ झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे काळात २०१४च्या निवडणुकीत २८२ व २०१९ च्या निवडणुकीत ३०३ झाली. आता आगामी निवडणुकीत ही संख्या ४०४ झाल्याशिवाय राहणार नाही,' असा दावा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला.
माय होम इंडियाद्वारे स्थापित करण्यात आलेले भारतीय संगीतसाधकांसाठीचे 'लता मंगेशकर स्मृति पुरस्कार' शुक्रवारी, २९ डिसेंबर २०२३ रोजी मंत्री रामदास आठवले आणि प्रख्यात गायक सुदेश भोसले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी आठवले बोलत होते. याप्रसंगी माय होम इंडियाचे संस्थापक सुनील देवधर यांची उपस्थित होती. कार्यक्रमांमध्ये एकूण १७ मान्यवरांचा पुरस्कार देउन सन्मान करण्यात आला.
'माय होम इंडियाचा आजचा कार्यक्रम हा खूपच महत्त्वाचा आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या नावाने जे पुरस्कार आज दिले जात आहे, तो कलाकारांचा मोठा सन्मान आहे. लता मंगेशकर यांचा आवाज केवळ भारतामध्येच नाही, तर जगातल्या कुठल्याही देशांमध्ये आपण गेलो तरी तेथे ऐकला जातो,'असे सांगत मंत्री आठवले पुढे म्हणाले,' सुनील देवधर हे भाजपचे उत्कृष्ट काम करीत आहे. त्यांचे व माय होम इंडियाचे काम खूपच कौतुकास्पद आहे.'
मंत्री आठवले यांच्या कवितांना रसिकांची दाद
याप्रसंगी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी कविता सादर करीत उपस्थित रसिकांची चांगलीच दाद मिळवली. 'मी माझ्या जीवनात खूप काही सोसले, म्हणून मला आज भेटले सुदेश भोसले,' अशी चारोळी सांगतानाच आठवले यांनी, 'गाण्यामध्ये सुदेशजी तुमचा आवाज चांगला आहे, पण भाषणांमध्ये तुमच्यापेक्षा माझा आवाज चांगला आहे,' असे सांगत आपल्या खास शैलीत सुदेश भोसले यांचा सन्मान केला.
माय होम इंडियाचे संस्थापक सुनीलजी देवधर यांनी याप्रसंगी माय होम इंडियाच्या वाटचालीची माहिती दिली. तसेच मंत्री रामदास आठवले यांच्या लोकांसाठी काम करण्याच्या पद्धतीचे कौतुक केले.
सुदेश भोसले यांनी रसिकांना केले मंत्रमुग्ध
स्व. दीनानाथ मंगेशकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्ताने माय होम इंडिया आयोजित भारतरत्न लता मंगेशकर यांच्या गाजलेल्या हिंदी, मराठी गाण्यांची 'ये समा...' ही सुश्राव्य, सुमधूर मैफिल याप्रसंगी आयोजित करण्यात आली होती. प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी या मैफिलीत चांगलीच रंगत आणली. 'हमे और जिने की चाहत ना होती, ' 'ये जो मोहब्बत है', 'सारा जमाना...' अशी विविध गाण्यांचे गायन करून प्रसिद्ध गायक सुदेश भोसले यांनी उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी सुदेश भोसले यांनी रसिकांमध्ये येऊन काही गाणी गायली. त्यामुळे रसिकांचा उत्साह द्विगुणीत झाला. रसिकांनी सुदेश भोसले यांच्या सोबत नाचण्याचा आनंद सुद्धा घेतला. रसिकांनी मोबाईल टॉर्च ऑन करत सुदेश भोसले यांना अनोखी दाद दिली. या प्रसंगी त्यांनी बॉलिवुड शहेनशहा अमिताभ बच्चन यांची मिमिक्री केली.
यांना मिळाले पुरस्कार
डॉ. शर्वरी जेमनिस ( अभिनेत्री), श्रावणी शेंडे ( शास्त्रीय गायन), श्रद्धा गायकवाड ( गायिका), सौरभ काडगावकर ( पार्श्वगायक/वादक), हभप नंदकुमार महाराज भांडवलकर, अनुजा बोरुडे-शिंदे (पखवाज वादन), पंढरीनाथ कोंडेकर , (भारुड), गोंदराज मावळे ( शास्त्रीय संगीत), आनंद देशमुख (निवेदन/सूत्रसंचालन), मिलिंद तुराडकर, प्रमोद मराठे, संतोष मोरे, मंदार परळीकर, श्रीपाद ब्रह्मे (चित्रपट परीक्षण), सौरभ करडे ( व्याख्याते/लेखक), अशोक कामठे (शाहीर)
टिप्पणी पोस्ट करा