ब्युरो टीम: आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल वाचन सुरु झाले असून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर साडे चार वाजता निकालाचं वाचन केले. २० जून २०२२ रोजी एकनाथ शिंदेंनी बंड केलं. त्यांना शिवसेनेच्या ४० आमदारांनी साथ दिली. त्यामुळे उद्धव ठाकरे सरकार कोसळलं. शिंदे भाजपसोबत गेले आणि राज्यात सत्तापालट झाला.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील 16 आमदारांच्या अपात्रतेचा निकाल सभापतींनी देण्यास सुरुवात केली आहे ते या 1200 पानी निर्णयातील महत्त्वाचे मुद्दे वाचत आहेत त्यातील महत्वाचे मुद्दे
• ठाकरे गटाच्या २५ जून २०२२ रोजी झालेल्या बैठकीबाबत संभ्रम आहे.
• प्रतिनिधी सभेच्या पत्रावर केवळ दोघांच्या सह्या आहेत. प्रतिनिधी सभा झाली की नाही याबाबत साशंकता आहे.
• मूळ राजकीय पक्ष म्हणून शिंदे गटाला मान्यता देतो
• भरत गोगावले यांना प्रतोत म्हणून मान्यता
• विधिमंडळ पक्ष ज्याचा, त्याचाच पक्ष
• शिंदे गट हीच खरी शिवसेना
यामुळे शिंदे सरकारला कोणताही धोका नाही. शिंदे सरकार हे आपला कार्यकाळ पूर्ण करणार
टिप्पणी पोस्ट करा