ब्युरो टीम: स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या रक्तदान शिबीरास विद्यार्थीं, सुरक्षा कर्मचारी इ. ने उत्तम प्रतिसाद दिला. एकूण 210 विद्यार्थ्यांनी प्रत्सयक्ष रक्तदान केले. विशेष म्हणजे या शिबिरात वेगवेगळ्या राजकीय पक्ष व विद्यार्थीं संघटनां प्रतिनिधींनी सामाजिक बांधिलकी व रक्तदान करून शांततेचा संदेश देण्याचे काम केले. राष्ट्रीय विद्यार्थीं काँग्रेस, युवक काँग्रेस व विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीच्या प्रतिनिधी रक्तदान केले. या शिबिरास राज्याचे उच्च शिक्षणमंत्री चंद्रकांतदादा पाटील, कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरू डॉ . पराग काळकर व प्रभारी कुलसचिव डॉ. विजय खरे यानी भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
- विद्यापीठातील वेगवेगळ्या विभागातील विद्यार्थ्यांनी तसेच विशेष म्हणजे विद्यापीठांमधील विविध विद्यार्थीं संघटनांनी रक्तदानात सहभाग घेतला. अभाविप नेहमीच सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. येणाऱ्या काळात देखील आम्ही विद्यार्थीं हिताचे कार्यक्रम घेणार आहोत. - शिवा बारोळे ( अभाविप पुणे विद्यापीठ अध्यक्ष)
टिप्पणी पोस्ट करा