JIjau : विश्वमाता-जिजाऊ

 

ब्युरो टीम : भारतभुमी हि शौर्याची, त्यागाची व बलिदानाची भूमी म्हणून ओळखली जाते. या देशात अनेक रत्ने जन्माला आली ज्यांनी कर्तृत्वाने देशाचा तिरंगा जगात फडकवला. अशीच एक कर्तृत्वान तेजोमय स्रीचा जन्म महाराष्ट्रात झाला जिने महाराष्ट्राला एक नव्हे तर दोन छत्रपती दिले.आदर्श माता कशी असावी याचे मुर्तीमंत उदाहरण म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ होय.आज १२ जाने. जिजाऊ यांची जयंती त्यानिमित्त त्यांच्या महान कार्यास उजाळा,

सिंदखेड राजा येथे जिजाऊचा जन्म झाला. बालपणापासूनच अन्यायाची व फितुरीची चीड जिजाऊस येत होती. जिजाऊ भविष्यात आपल्या कतृत्वाने अन्यायी व बलाढ्य सत्ता उलथवेल असे कोणाला वाटले नसेल. त्याकाळी महाराष्ट्रात सर्वत्र अंधकार पसरलेला होता. अन्याय, अत्याचार वाढले होते.घोडे टापांचा आवाज येताच लोक भयभीत होत असत. मुलींची इज्जत दिवसा ढवळ्या वेशीवर टांगली जात होती. पुणे भकास, कंगाल उद्धवस्त झाले होते. शत्रूने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवला होता.जिजाऊने अंधश्रध्देची पहार उखडून् फेकुन दिली. सुलतानी सत्तेला आव्हान करत लोकांस पुना येथे येण्याची आव्हान केले.

 शिवबाला स्वराज्य निर्माण करुन रयतेचे राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. वेळप्रसंगी स्वता हातात तलवार घेवुन लढणारी जिजाऊ हि रणझूंजार मर्दानी माता होती. शिवबाला रयतेच्या कल्याणासाठी शत्रू विरोधात उभे केले. पुढे जावून ध. संभाजी राजेना ही जिजाऊने घडवले. युद्धनिती, रणनिती, राजनीती  याचे बाळकडू शिवबाला जिजाउँ, कडूनच मिळाले. एक स्त्री स्वकर्तुत्वाने काय करू शकते ते जिजाऊने जगाला दाखवले. स्वराज्याची खरी प्रेरणा हि जिजाऊँ होत्या.

 आपले व कुटुंबाचे आयुष्यच रयतेच्या कल्याणासाठी वाहुन घेणारी जिजाऊ होत्या. आज काळ बदलला पण आम्हीं जिजाऊचा इतिहास कधीचं विसरु शकत नाही.

जिजाऊ म्हणजे जि- जिज्ञासा, जा-जागृती, उ-उत्कर्ष यांचा त्रिवेणी संगम म्हणजे जिजाऊ होय. जिजाऊंचे आदर्श कार्य आम्हाला कायमच जगण्यास प्रेरणा देत राहील.


लेखक - महेंद्र मिसाळ (प्रसिद्ध व्याख्याते व लेखक)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने