ब्युरो टीम : श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांनी जगाला जेथून ज्ञानेश्वरी सांगितली अशा अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तिर्थक्षेत्री वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष तथा डॉ श्रीकांत शिंदे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा आगार येथे मोफत आरोग्य शिबीर गुरूवार दि. ११ जानेवारी २०२४ रोजी घेण्यात आले असून, या आरोग्य शिबिरामध्ये गोरगरीब गरजूवंत रूग्ण, रापम कर्मचारी व नागरिक यांची मोफत एच.आय.व्ही तपासणी,आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात आले. मोफत आरोग्य शिबिरामुळे वैद्यकीय उपचार लाभ झाल्यामुळे नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
मोफत आरोग्य शिबीर प्रसंगी अहमदनगर (उत्तर जिल्हा) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री. सचिन काळे यांनी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मा.ना.एकनाथ शिंदे साहेबांच्या धडाकेबाज निर्णय घेण्याच्या कार्याची व शासन आपल्या दारी उपक्रमाची माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता मुळ संकल्पना तथा कक्ष प्रमुख मा.श्री.मंगेश चिवटे साहेब हे मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षा मार्फत करत असलेल्या रूग्ण सेवेच्या बहुमोल कार्याची माहिती दिली. तसेच, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीची प्रक्रिया संपूर्णतः निःशुल्क असून मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी टोल फ्री "8650567567" हेल्पलाईन नंबर द्वारेही मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी संबंधित माहिती प्राप्त करता येत असल्याचे सांगितले.
आतापर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षा मार्फत बहुसंख्य रूग्णांच्या गंभीर शस्त्रक्रियेसाठी १८५ कोटी रुपये वितरीत करण्यात आले असल्याची माहिती श्री.सचिन काळे यांनी यावेळी दिली.
या मोफत आरोग्य शिबीर प्रसंगी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मार्गदर्शक माहिती पत्रक व फाॅर्म वितरित करण्यात आले. यावेळी नेवासा तालुक्याचे पोलीस निरीक्षक श्री.धनंजय जाधव साहेब, नेवासा मुख्याधिकारी गरकळ साहेब, आरोग्य अधिकारी डॉ.पतंगे, नेवासा आगार प्रमुख मगर साहेब, अहमदनगर (उत्तर जिल्हा) शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख श्री. सचिन काळे, प्रवाशी संघटनेचे अध्यक्ष अनिल टाके, वाहतूक निरीक्षक मुुरगारे साहेब, सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक संगिता विटनोर उपस्थित होते. सुत्रसंचालन वासुदेव आव्हाड यांनी केले तर राकेश सोनवणे यांनी आभार मानले.
टिप्पणी पोस्ट करा