ब्युरो टीम श्री रामलला प्राण-प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी होणार असून भाजप शासित राज्यात यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. महाराष्ट्र सरकारने 22 जानेवारी साठी कोणतीही मोठी घोषणा केली नसली तरी श्री रामलला प्राण-प्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी रोजी उत्तर प्रदेशात 'राष्ट्रीय उत्सव' म्हणून साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी 22 जानेवारीला शैक्षणिक संस्थांना सुट्टी जाहीर केली आहे. प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी युपी मध्य मद्यविक्रीवर बंदी घातली आहे. सरकारने मंगळवारी हे आदेश जारी केले आहेत.
14 जानेवारीला मुख्यमंत्री अयोध्येत स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करणार आहेत. आज अयोध्येत पोहोचलेले मुख्यमंत्री योगी यांनी अभिषेक सोहळ्याच्या तयारीची पाहणी केली आणि स्वच्छता आणि सुरक्षेशी तडजोड केली जाणार नसल्याचे सांगितले. व्हीव्हीआयपींच्या विश्रांतीची ठिकाणे अगोदरच ठरवावीत, असे निर्देश त्यांनी दिले. अयोध्याधाममध्ये येणार्या भाविक/पर्यटकांना देखील पर्यटक मार्गदर्शक तैनात करण्यास सांगितले आहे जे त्यांना दिव्य आणि भव्य अयोध्येच्या वैभवाची ओळख करून देतील.
22 जानेवारीला राम मंदिराच्या अभिषेकासाठी देश आणि जगातील सर्व पाहुणे अयोध्येत येणार आहेत. या पार्श्वभूमीवर अयोध्या जिल्हा प्रशासन जिल्ह्यातील सर्व हॉटेल्समध्ये पाहुण्यांच्या निवासाची व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. दुसरीकडे, अयोध्येला लागून असलेल्या लखनऊचे हॉटेलचालकही पाहुण्यांच्या स्वागताची तयारी करत आहेत. अयोध्येत पर्यटकांना अविस्मरणीय आदरातिथ्य मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. तसेच 22 जानेवारीला सर्व शासकीय इमारती सजवाव्यात आणि फटाक्यांचीही व्यवस्था करण्याचे आदेश देखील दिले गेले आहे.
युपी सरकारच्या धर्तीवर २२ जानेवारीच्या सोहळ्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणते आदेश पारित करते त्याची उत्सुकता श्रीराम भक्तांना लागली आहे.
टिप्पणी पोस्ट करा