monsoon tourism : पर्यटनाला जाताय? धोकादायक ठिकाणी रिल्स काढणे टाळा



ब्युरो टीम : महाराष्ट्रात सर्व दूर पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आता मान्सून पर्यटनाला जाणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. पर्यटनाला गेल्यानंतर सेल्फी, रिल्स अनेकजण काढतात. पण स्वतःच्या सुरक्षेचा विचार करून धोकादायक ठिकाणी सेल्फी रिल्स काढण्याचा मोह आवरणे गरजेचे आहे. 

पर्यटनाला गेल्यानंतर स्वतःच्या सुरक्षेच्या दृष्टीने कशी काळजी घ्यावी, याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. चला तर, याबाबत जाणून घेऊ. 

अशी घ्या काळजी

- धोकादायक ठिकाणी सेल्फी, रिल्स काढणे टाळा.

- सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

- नदी, ओढे, नाले काठच्या नागरिकांनी दक्ष राहावे. तसेच पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदी पात्रापासून दूर राहावे, व सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

- पुलावरुन पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नका.

- पूर पाहण्यासाठी गर्दी करू नये.

- धोकादायक इमारतींमध्ये आश्रय घेऊ नये.

- डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी व वेळीच सुरक्षित स्थळी स्थलांतर करावे.

- घाट रस्त्याने प्रवास करणे टाळा.

- नदीच्या पाण्याच्या प्रवाहामध्ये उतरू नका.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने