pune RTO : आरटीओ विभागाचे ‘अपघातमुक्त वारी’ अभियानब्युरो टीम : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी भाविकांत रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती व्हावी यादृष्टीने ‘अपघातमुक्त वारी’ अभियानाचे आयोजन करण्यात आले.  

या अभियानात पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयांतर्गत आळंदी रोड, दिवे कार्यालय येथे शुभ्र वस्त्रात टाळ मृदुंगाच्या साथीने वारकऱ्यांमध्ये रस्ता सुरक्षा, वाहतूक नियम, लेन शिस्त, उजवीकडून चाला, वेग नियंत्रण आदीबाबत जागर करण्यात आला. 'डावी बाजू गाडीची उजवी बाजू पायांची' असा संदेश देणारी दोन वारी कालावधीची दिनदर्शिका तसेच 'पाळावा नियम, बाळगावा संयम', 'सुरक्षित अंतर, सुरक्षित प्रवास' असा संदेश असणाऱ्या एक प्रत्येकी हजार कापडी शबनम पिशव्या, रेनकोट व दोन हजार रस्ता सुरक्षेबाबत पत्रकांचे वारकऱ्यांना वाटप करण्यात आले. 

रस्ता सुरक्षा परावर्तित फलक (रिफ्लेक्टर्स) सुयोग्य ठिकाणी लावून रस्ता सुरक्षेबाबत मार्गदर्शन करण्यात आले. विश्रांतवाडी चौक, आळंदी रोड, बंडगार्डन, कोरेगाव पार्क, दिवे घाट (सासवड रोड) व ऊरुळी कांचन येथे वारकऱ्यांसाठी मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले. 

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सर्व मोटार वाहन निरीक्षक, सहायक मोटर वाहन निरीक्षक व वाहनचालकांनी पालखीत उस्फूर्त सहभाग घेतला, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने