Women Entrepreneur : उद्या घोले रोडवरील पं. नेहरू सभागृहात महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन; सोमेश्वर फाउंडेशनचा महिला उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी अभिनव उपक्रम

 

ब्युरो टीम : नुकत्याच झालेल्या जागतिक MSME दिनानिमित्त सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी भव्य महिला उद्योजिका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.  उद्या दुपारी २. ३० वाजता घोले रोडवरील पंडित नेहरू सभागृहात रंगणाऱ्या या मेळाव्याचे उदघाटन माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या हस्ते होणार आहे. या महिला मेळाव्याचा आयोजनासाठी दे आसरा फाउंडेशन,  मराठा इंटरप्रन्युअर्स असोसिएशन व उडान फाउंडेशनचे मोलाचे सहकार्य लाभले आहे.  यावेळी उद्योग विश्वात आपले कर्तृत्व सिद्ध केलेल्या महिला नवीन महिला उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.

या मेळाव्यात सूक्ष्म- लघु- मध्यम उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी विशेष उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यासाठी उद्योग विश्वात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिला उद्योजिकांचे मोफत मार्गदर्शन मिळणार आहे. यावेळी महिलांना आपल्या उत्पादनाचे व उद्योगांचे एक मिनिटाचे सादरीकरण करण्याची व आकर्षक बक्षिसे जिंकण्याची संधी उपलब्ध आहे.

सोमेश्वर फाउंडेशन सातत्याने महिलांना एक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असते. या मेळाव्यात व्यावसायिक मानसिकता घडविण्यासाठी सकारात्मक परिवर्तन करण्यासाठी सौ. तेजस्विनी पिसाळ या मार्गदर्शन करणारा आहेत तर उद्योग चालवताना आर्थिक शिस्तीचे धडे सौ . वैशाली अपराजित या देणार आहेत. 

यावेळी नव्याने व्यवसाय किंवा उद्योग सुरु करण्यास उत्सुक असणाऱ्या महिलांना तज्ञांची प्रत्यक्ष भेट व सल्ला मसलतीची संधी सोमेश्वर फाउंडेशन ने उपलब्ध करून दिली आहे. तसेच अनेक नामांकित कार्पोरेट कंपन्यांमध्ये स्टोल ठेवण्याची संधी महिला उद्योजकांना दिली जाणार आहे. यासाठी जास्तीत जास्त महिलांनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा असे आवाहन सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

 

 


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने