ABVP : अभाविपचा वर्धापन दिनानिमित्त पुणे विद्यापीठात एक विद्यार्थी एक झाड उपक्रम संपन्न

 

ब्युरो टीम : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या 76 व्या वर्धापन देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये "एक विद्यार्थी एक झाड" या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थी परिषद 9 जुलै हा "राष्ट्रीय विद्यार्थी दिवस" म्हणून देशभरात साजरा करते.देशातला युवक हा उद्याचा नाही तर आजचा जबाबदार नागरिक आहेत." पढाई के साथ देश और समाज की लढाई" हे ब्रीदवाक्य घेऊन गेली 76 वर्ष विद्यार्थी परिषद अखंड राष्ट्रनिर्माणासाठी तेवत आहे. सामाजिक राजकीय, उद्योग, शिक्षण यासारख्या अनेक क्षेत्रात समर्पित कार्यकर्त्यांची मांदियाळी विद्यार्थी परिषदेने निर्माण केली आहे.   

पर्यावरणाशी नाते समृद्ध करून निसर्गाप्रमाणे सदैव देण्याची वृत्ती प्रत्येक कार्यकर्त्यांनी आजवर जोपासली आहे. विद्यापीठात विद्यार्थी हितासाठी नेहमीच विद्यार्थी परिषद कटिबद्ध आहे आणि राहील असा विश्वास विद्यापीठ अध्यक्ष शिवा बारोळे यांनी मांडला.   यावेळी कार्यक्रमाला विद्यापीठाचे प्रशासकीय प्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी यांनी भेट देऊन सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी पुणे महानगर आणि विद्यापीठातील अनेक विद्यार्थी कार्यकर्ते मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.

विद्यार्थी हे राष्ट्र निर्मितीसाठी महत्त्वाचे भूमिका पार पाडत असतात आणि याच विद्यार्थ्यांच्या माध्यमातून निसर्गाचे जतन संवर्धन झालं पाहिजे. या उद्देशाने आज विद्यापीठांमध्ये अभविपीच्या वतीने एक विद्यार्थी एक झाड या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमामध्ये विद्यार्थी तसेच प्राध्यापक इ. सहभाग घेतला व वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांचे लागवड करण्यात आली. 

                 शिवा बारोळे ( अध्यक्ष - ABVP पुणे विद्यापीठ)

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने