ब्युरो टीम : अव्वल बॅटमिंटनपटू आणि देशाला सलग दोन वेळा ऑलिम्पिक पदक जिंकून देणाऱ्या पीव्ही सिंधूला पराभवाचा धक्का बसला. महिला एकेरीत राउंड ऑफ १६ च्या लढतीत सिंधूचा चीनच्या बिंग जाओशीने पराभव केला.
गुरुवारी झालेल्या सामन्यात चीनच्या हि बिंग जिओने टोकियो ऑलिम्पिकमधील पराभवाचा बदला २-० ने घेतला. त्यामुळे पी.व्ही. सिंधूची ऑलिम्पिक पदकाची हॅट्ट्रिक हुकली आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर असलेली चीनची हि बिंग जियाओने महिला एकेरीच्या प्री-क्वार्टर फायनलमध्ये सरळ गेममध्ये विजय मिळवत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. ५६ मिनिटे चाललेल्या राऊंड ऑफ १६ सामन्यात तिला बिंग जियाओने २१-१९, २१-१४ अशा फरकाने पराभूत केले.
टिप्पणी पोस्ट करा