Swapnil Kusale : कोल्हापूरच्या स्वप्नीलने जग जिंकले, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकत घडवला इतिहास



ब्युरो टीम :  भारताचा स्टार नेमबाज स्वप्नील कुसाळेने पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमध्ये 451.4 गुण नोंदवून इतिहास रचला. त्याने करिष्मा करत भारतासाठी कांस्यपदक जिंकले. पुरुषांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशनमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकणारा स्वप्नील कुसाळे या स्पर्धेत कांस्यपदक जिंकणारा पहिला भारतीय ठरला.  या स्पर्धेचे सुवर्ण चीनच्या लियू युकुनने (463.6 गुण) जिंकले. रौप्य पदक कुलिस सेरीला (461.3 गुण) याने जिंकले

स्वप्नील कुसाळेने डावाची संथ सुरुवात केली. त्याने 153.3 (पहिली मालिका- 50.8, दुसरी मालिका- 50.9, तिसरी मालिका- 51.6) गुणांसह तो सहाव्या क्रमांकावर राहिला. यानंतर, प्रोनमध्ये त्याने 156.8 (पहिली मालिका - 52.7, दुसरी मालिका - 52.2, तिसरी मालिका - 51.9) स्कोअर करून आपली स्थिती सुधारली. प्रोननंतर तो पाचव्या क्रमांकावर पोहोचला होता. त्यानंतर क्रमवारीत, स्वप्नील कुसाळेने पहिल्या मालिकेत 51.1 आणि दुसऱ्या मालिकेत 50.4 म्हणजेच एकूण 101.5 गुण मिळवले. येथेच तो तिसऱ्या स्थानावर पोहोचला, आणि एलिमिनेशनमध्ये त्याने शानदार पद्धतीने कामगिरी करीत कांस्यपदक पटकावले. 

दरम्यान, पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. यापूर्वी मनूने वैयक्तिक आणि सरबज्योत सिंगसोबत सांघिक स्पर्धामध्ये कांस्यपदक पटकावले होते.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने