Actor Sanjeev Kumar : ‘या’ अभिनेत्याला नॉनव्हेज खाण्याची होती खूप आवड, वयाच्या 47 व्या वर्षी घेतला जगाचा निरोप

 

ब्युरो टीम :  'शोले' मधील ठाकूर अर्थात संजीव कुमार यांची आज, बुधवारी  डेथ अॅनिव्हर्सरी आहे. 6 नोव्हेंबर 1984 ला वयाच्या 47 व्या वर्षी ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्यानं त्यांचे निधन झाले होते. संजीवकुमार यांनी बॉलिवूडला अनेक सुपरहिट सिनेमे दिले होते.

संजीव कुमार यांना जी भूमिका दिली जायची, ती भूमिका ते तितक्याच खुबीने निभावत असत. त्यांच्या अभिनयाची वेगवेगळी रूपे ‘अंगूर’, ‘कोशिश’, ‘खिलौना’, ‘पती, पत्नी और वो’ या चित्रपटांतून पाहायला मिळतात. 1974 साली प्रदर्शित झालेल्या ‘नया दिन नयी रात’ चित्रपटात त्यांनी नऊ भूमिका साकारल्या होत्या. एकाच वेळी इतक्या भूमिका साकारणारे ते पहिलेच कलाकार होते. 

मृत्यूनंतर रिलीज झाले दहा चित्रपट

संजीवकुमार यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या 10 फिल्म रिलीज झाल्या होत्या. यातील बहुतेक फिल्मचे शूटिंग राहिले होते. यांच्या कथानकात थोडा बदल करुन फिल्म रिलीज करण्यात आल्या. संजीवकुमार यांच्या मृत्यूनंतर तब्बल 8 वर्षांनी 'प्रोफेसर की पडोसन' (1993) रिलीज झाला होता. याशिवाय 'कातिल' (1986), 'हाथों की लकीरें' (1986), 'बात बन जाए' (1986), 'कांच की दीवार' (1986), 'लव अँड गॉड' (1986), 'राही' (1986), 'दो वक्त की रोटी' (1988), 'नामुमकिन' (1988), 'ऊंच नीच बीच' (1989) यांचा समावेश आहे.

नॉनव्हेज खाण्याची होती आवड

अभिनयाशिवाय संजीव कुमार यांना वेगवेगळ्या पदार्थांवर ताव मारण्याचा छंद होता. ते खूप खवय्ये होते. अभिनेता सचिन पिळगावकर यांनी एका सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान संजीव कुमार आणि त्यांच्या खाण्याबद्दलच्या आवडीचा किस्सा सांगितला होता. ते म्हणाले होते, 'संजीव कुमार यांना मांसाहार खूप आवडायचा. पण घरी मांसाहार खायला परवानगी नसल्यामुळे संजीव कुमार यांनी भाड्याने स्वतंत्र फ्लॅट घेतला होता, जेणेकरून ते तिथे आरामात मांस आणि मासे खाऊ शकतील आणि आपले घरही शुद्ध राहील.'

दरम्यान, आपल्या वयापेक्षा मोठ्या वयाच्या भूमिका साकारणाऱ्या या कलाकाराने वयाच्या 47 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने