ब्युरो टीम : अमेरिकेच्या अध्यक्षपदाचे निवडणूक निकाल समोर आले आहेत. रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष बनले आहेत. त्यांनी कमला हॅरिस यांचा पराभव करत पुन्हा एकदा अमेरिकेचं अध्यक्षपद मिळवलं आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी २७० चा बहुमताचा आकडा पार करत हा विजय मिळवला.
#USElection2024 वैशिष्ट्ये :- रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे ४७ वे अध्यक्ष बनले- कमला हॅरिस यांचा पराभव करत मिळवलं अमेरिकेचं अध्यक्षपद- ट्रम्प यांना २७७ तर हॅरिस यांना २२६ इलेक्टोरल मते मिळाली- ट्रम्प यांनी २७० चा बहुमताचा आकडा केला पार#USAElection2024 https://t.co/9nTf9Ypzky— Latest Election Updates (@Marathi_print) November 6, 2024
रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार व अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार व विद्यमान उपाध्यक्षा कमला हॅरिस यांच्यात राष्ट्राध्यक्षपदासाठी थेट लढत पहायला मिळाली. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांना २७७ इलेक्टोरल मते मिळाली तर त्याचवेळी कमला हॅरिस यांना केवळ २२६ इलेक्टोरल मते मिळाली आहेत.
टिप्पणी पोस्ट करा