maharashtra election : विधानसभा निवडणुकीसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील उमेदवारांचे दैनंदिन खर्च तपासणी वेळापत्रक जाहीर


ब्युरो टीम: भारत निवडणूक आयोगाच्या निवडणुक खर्च संनियंत्रण यावरील अनुदेशांचा सारसंग्रहमधील लेख्यांची तपासणी या तरतूदीनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात  विधानसभा निवडणुकीसाठी सर्व मतदारसंघातील उमेदवारांनी ठेवलेल्या दैनंदिन निवडणूक खर्चाची तपासणी खर्च निरिक्षक यांच्यामार्फत संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात  करण्यात येणार आहे.

खर्च तपासणीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे.  

अकोले मतदारसंघाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १८  नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे. संगमनेर मतदारसंघाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १८  नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २.३०  ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे. 

शिर्डी मतदारसंघाची पहिली तपासणी १० नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १९  नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे. कोपरगाव मतदारसंघाची पहिली तपासणी १० नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १९  नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २.३०  ते सायंकाळी ६  या वेळेत होणार आहे.

राहुरी मतदारसंघाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १८  नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे.  श्रीरामपूर मतदारसंघाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १८  नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २.३०  ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.

नेवासा मतदारसंघाची पहिली तपासणी १० नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १९  नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे. शेवगाव मतदारसंघाची पहिली तपासणी १० नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १९  नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २.३०  ते सायंकाळी ६  या वेळेत होणार आहे.

कर्जत जामखेड मतदारसंघाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १८  नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे.  श्रीगोंदा मतदारसंघाची पहिली तपासणी ९ नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १३ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १८  नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २.३०  ते सायंकाळी ६ या वेळेत होणार आहे.

पारनेर मतदारसंघाची पहिली तपासणी १० नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १९  नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी १० ते दुपारी १.३० या वेळेत होणार आहे. अहमदनगर मतदारसंघाची पहिली तपासणी १० नोव्हेंबर रोजी, दुसरी तपासणी १४ नोव्हेंबर आणि तिसरी तपासणी १९  नोव्हेंबर २०२४ रोजी दुपारी २.३०  ते सायंकाळी ६  या वेळेत होणार आहे.

सर्व संबंधितांनी याची नोंद घ्यावी, असे खर्च संनियंत्रण कक्षाचे समन्वयक अधिकारी तथा मुख्य वित्त व लेखा अधिकारी शैलेश मोरे  यांनी कळविले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने