ब्युरो टीम : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत शहरातील दिव्यांग बांधवांनी महानगरपालिकेत १०० टक्के मतदानाचा संकल्प करत शपथ घेतली. त्यांच्याकडून स्वयंघोषणापत्र देखील घेण्यात आले. सर्व दिव्यांग बांधव मतदानाचा अधिकार पूर्णपणे बजावणार असल्याचे संकल्प पत्र देखील भरून घेण्यात आले.
#विधानसभा_निवडणूक_2024 पार्श्वभूमीवर #अहिल्यानगर शहरात महानगरपालिकेच्या वतीने मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. या अंतर्गत शहरातील दिव्यांग बांधवांनी महानगरपालिकेत १०० टक्के मतदानाचा संकल्प करत शपथ घेतली. @AmcNagar pic.twitter.com/eCGhm8IVrK
— Latest Election Updates (@Marathi_print) November 6, 2024
आयुक्त यशवंत डांगे म्हणाले की, शहरातील विविध घटकातील नागरिक दिव्यांग बांधव तृतीयपंथी आदींमध्ये जनजागृती करून शंभर टक्के मतदानाचा संकल्प करणारी शपथ सर्वांना दिली जात आहे. महानगरपालिकेच्या बस सेवा देणाऱ्या बसेस, बस स्टॉप, कचरा संकलन करणाऱ्या घंटागाड्या आदींवर फलक लावून, जिंगल्स वाजवून मतदारांमध्ये जनजागृती केली जात आहे. मतदारांकडून संकल्पपत्र भरून घेतले जात आहेत महापालिकेतील देयके, विविध पावत्यांवर वॉटरमार्क द्वारे मतदार जागृतीचा लोगो छापण्यात आला आहे. सोशल मीडियात अधिकाऱ्यांमार्फत मतदारांना मतदानासाठी आवाहन केले जात आहे. शाळा व महाविद्यालयांमध्ये विविध उपक्रम, कार्यक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. विविध मॉर्निंग ग्रुप मध्ये चर्चासत्र घडवून आणत वेगळ्या प्रकारे जनजागृती केली जात आहे.
नागरिकांशी संवाद साधताना रस्त्यांच्या कामांचाही घेतला आढावा
मतदार जागृतीसाठी आयुक्त यशवंत डांगे यांनी थेट रस्त्यावर उतरून नागरिकांशी संवाद साधला. यावेळी पत्रकार चौक ते दिल्लीगेट या रस्त्याच्या कामाची पाहणी करत कामाचा आढावा त्यांनी घेतला. कामामुळे वाहतुकीस अडथळा होत असला तरी भविष्यात चांगले रस्ते उपलब्ध होणार असल्याने व कायमचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने नागरिकांनी समाधानही व्यक्त केले. रस्त्याचे काम सुरू असताना नागरिकांना वाहतुकीस अडथळा होणार नाही, यादृष्टीने शक्य त्या उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही आयुक्त यशवंत डांगे यांनी ठेकेदार संस्थेला दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा