ब्युरो टीम : ‘अण्णा हजारेंना महात्मा करण्याचं काम केजरीवाल, सिसोदिया यांनी केलं. नाहीतर त्यांनी कधी दिल्ली पाहिली असती का?,’ असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी करीत अण्णा हजारे यांच्यावर जोरदार टिका केली आहे.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पक्षाचे नेते, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह प्रमुख नेत्यांचाही पराभव झाला आहे. याबाबत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी आपली प्रतिक्रिया देताना नेमका पराभव कशामुळे झाला? हे सांगितले आहे. त्यातच आता अण्णा हजारे यांच्यावर खासदार राऊत यांनी टिका केली आहे. ते माध्यमांशी संवाद साधत होते.
अण्णा हजारे यांच्यावर टिका करताना संजय राऊत म्हणाले की, ‘अण्णा हजारे हे केवळ राळेगणचे दैवत होते. अण्णा हजारेंना महात्मा करण्याचं काम केजरीवाल, सिसोदिया यांनी केलं. नाहीतर त्यांनी कधी दिल्ली पाहिली असती का?,’ असा प्रश्न उपस्थित करतानाच राऊत पुढे म्हणाले, ‘अण्णांच्या दिल्ली येथील आंदोलनाला जो काही आवाका केजरीवाल, सिसोदिया यांनी दिला त्यानंतर ते देशाला माहित झाले. केजरीवाल आणि सिसोदियांनी भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढाईला तोंड फोंडलं, अण्णा हजार त्याचे प्रतिक होते. त्यानंतर महाराष्ट्रात भ्रष्टाचाराचे इतके स्फोट झाले, भ्रष्ट सरकारच्या बाजूने उभे राहिले. मोदी सरकार असो किंवा शिंदे-फडणवीसांचं सरकार असेल त्यावेळी अण्णांनी राळेगणमध्ये कूसही बदलली नाही हे दुर्देर्वाने सांगायला लागत आहेत,’ असंही संजय राऊत यांनी म्हटलं होतं.
टिप्पणी पोस्ट करा