ब्युरो टीम: नागरिकांना, खेळाडूंना चांगल्या क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर येथील सावेडी उपनगर परिसरात क्रीडा संकुलाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.गंगा उद्यानजवळ सुमारे या क्रीडा संकुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. येत्या दोन वर्षात वेळेत संकुल उभारणीचे काम पूर्ण होणार आहे. सद्यस्थितीत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. कामाला वेग देण्याच्या सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या आहेत.
आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी सावेडी क्रीडा संकुलाच्या कामाचा आढावा घेतला. आमदार संग्राम जगताप यांच्या पुढाकारातून या प्रकल्पासाठी सहा कोटी रुपये निधी उपलब्ध झाला आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या इनडोअर व आऊटडोअर क्रीडा प्रकारांसाठी मैदाने व सुविधा देण्यात येणार आहेत. तसेच, सावेडी उपनगर परिसरात प्रथमच मनपाच्या जलतरण तलावाची उभारणी केली जाणार आहे. लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील व्यक्तींना या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
क्रीडा संकुलाचे काम सुरू आहे. सद्यस्थितीत ३० टक्के काम पूर्ण झाले आहे. प्रकल्पात आणखी काही कामे करावी लागणार आहेत. त्यासाठी अतिरिक्त निधी लागणार आहे. त्यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्या मार्फत राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने कामाचे नियोजन करावे, अशा सूचना आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिल्या आहेत.
टिप्पणी पोस्ट करा