Ahilyanagar :जिल्ह्यातील १६ केंद्रांवर ४ मे रोजी होणार 'नीट' परीक्षा


विक्रम बनकर, अहिल्यानगर : राष्ट्रीय परीक्षा एजन्सीमार्फत नीट परीक्षा २०२५ (NEET) ४ मे २०२५ रोजी दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत १६ केंद्रावर घेण्यात येणार आहे. परीक्षा केंद्राच्या परिसरात कोणताही गैरप्रकार होऊ नये तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी उपविभागीय दंडाधिकारी सुधीर पाटील यांनी अहिल्यानगर उपविभागाच्या महसूल स्थळसीमेच्या हद्दीतील परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामध्ये वरील दिनांकास सकाळी  १० ते सायंकाळी ८ या वेळेत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. 

पहा व्हिडिओ : चला हवा येऊ द्या फेम योगेश शिरसाट यांची यशामागची खडतर कहाणी, पहिल्यांदाच त्यांच्या तोंडून!

परीक्षा केंद्राच्या १०० मीटर परिसरामधील सर्व सार्वजनिक टेलिफोन, एसटीडी. आय.एस.डी, फॅक्स केंद्र, ध्वनीक्षेपक, झेरॉक्स मशिन, स्कॅनिंग मशिन, मोबाईल फोन व इतर इलेक्ट्रॉनिक माध्यमे, वस्तु कार्यान्वित ठेवण्यात येऊ नयेत. परीक्षा उपकेंद्राच्या परिघामध्ये परिक्षार्थी म्हणून घोषित केलेले उमेदवार व परीक्षा पार पाडण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केलेल्या व्यक्तीशिवाय इतर व्यक्तींना वाहनांने अथवा पायी फिरण्यास, उभे राहण्यास प्रतिबंध करण्यात आला असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. 

पहा व्हिडिओ : महाराष्ट्रातून किती पाकिस्तानी नागरिक परत गेले? 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने