Anna Hazare : पाकिस्तान अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देतंय? अण्णा हजारे म्हणतात...

विक्रम बनकर, अहिल्यानगर :  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारताने पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्या आहेत. सिंधू नदी पाणी वाटप कराराला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत आता ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

पहा व्हिडिओ: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्या महाराष्ट्रातील सहा जणांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारची मदत जाहीर

सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानसाठी थांबवणं ही कृती योग्य असल्याचे अण्णा हजारे म्हणाले. नाक दाबलं की तोंड उघडतं.. अशी म्हण आहे. त्याप्रमाणे सिंधू नदीचे पाणी थांबवणे ही कृती करणं गरजेची असल्याचे अण्णा हजारे म्हणाले.

पहा व्हिडिओ : पहलगाम हल्ल्याचा उल्लेख करीत मुख्यमंत्री योगींचा समाजवादी पक्षावर वर हल्लाबोल!

पाकिस्तान अणुबॉम्ब टाकण्याची धमकी देत आहे, यावर तुमचं मत काय? असे विचारले असता अण्णा हजारे म्हणाले,' पाकिस्तानला म्हणा, काय करायचे ते करा. भारत हा लढण्यासाठी तयार आहे. समाजासाठी लढाई करण्याची तयारी प्रत्येकानेच ठेवली पाहिजे.'

दरम्यान, पहलगाम दहशतवादी हल्ल्याने सध्या देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वसामान्यांपासून कलाकार, नेते, समाजसेवक पाकिस्तानला सरकारने धडा शिकवावा, अशी मागणी करीत आहे.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने