विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहिल्यानगर शहरातील सिद्धार्थ नगर भागातील कचरा महानगरपालिकेने नियमितपणे न उचलल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी नगरसेवक धनंजय जाधव यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी महानगरपालिका आयुक्त यांना निवेदनही पाठवले आहे.
जाधव यांनी निवेदनात म्हंटले आहे की,' माझ्या प्रभाग क्रमांक ९ मधील सिद्धार्थ नगर भागात अनेक दिवसांपासुन कचरा साचलेला आहे. सिद्धार्थ नगर भाग हा मोठ्या लोकवस्तीचा आणि पालिकेचे अनेक कर्मचारी याच प्रभागात राहतात. त्यांचे व त्यांच्या मुलांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. ज्या ठिकाणी हा कचरा साचलेला आहे, त्याच्या बाजूला एक हाॅस्पिटल व आपल्या महानगर पालिकेचे आरोग्य केंद्र आहे. अनेक रुग्ण या हाॅस्पिटल मध्ये व आपल्या आरोग्य केंद्रात उपचार घेण्यासाठी येतात. त्या ठिकाणी कचरा साचल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात दूर्गंधी पसरलेली आहे, व अनेक लोक आजारी पडत आहे. तरी संबंधित विभागाला सिद्धार्थ नगर भागातील कचरा त्वरित उचलण्याचे आदेश द्यावे ही विनंती. अन्यथा सर्व नागरिकांसमवेत तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल, याची दखल घ्यावी.
पहा व्हिडिओ : अहिल्यानगर येथे भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
टिप्पणी पोस्ट करा