Delhi : रवींद्रनाथ ठाकूर यांचे जीवन आणि तत्वज्ञान यावर भाषण स्‍पर्धा

ब्युरो टीम: केंद्र सरकारच्या संसदीय कार्य मंत्रालयाच्‍या सचिवालयाअंतर्गत पार्लियामेंटरी रिसर्च एण्ड ट्रेनिंग इंस्टीट्यूट फॉर डेमोक्रेसीज  (प्राईड)(Parliamentary Research & Training Institute for Democracies (PRIDE) च्यावतीने स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये राज्यातून महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयातील दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे.  यामध्ये बी. एड. द्वितीय वर्षाचा विद्यार्थी देवब्रत दुबे व राज्‍यशास्‍त्र विभागाची एम.ए. द्वितीय वर्षाची विद्यार्थी प्रगती तेलंग या विद्यार्थ्यांची नावे आहेत.

या कार्यक्रमासाठी निवड प्रक्रियेअंतर्गत दि. ३० एप्रिल रोजी पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी एक वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये दोन विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. त्यानंतर दि. १ मे रोजी राष्ट्रीय स्तरावर ऑनलाइन बहुपर्यायी प्रश्नाधारित परीक्षा आयोजित करण्यात आली होती. यापैकी विश्‍वविद्यालयातील दोन विद्यार्थी देवब्रत दुबे आणि प्रगती तेलंग निवडले गेले. हे दोन विद्यार्थी  संसद भवनात आयोजित कार्यक्रमात रवींद्रनाथ ठाकूर यांचे जीवन आणि तत्त्वज्ञान या विषयावर आपले मत मांडतील. या प्रसंगी लोकसभेचे अध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्रिमंडळातील इतर मंत्री उपस्थित असतील.

या स्पर्धेचे आयोजन राष्ट्रीय युवक संसद स्पर्धेचे संयोजक आणि इतिहास विभागाचे प्रभारी डॉ. बालाजी चिरडे यांनी केले. निवडल्या गेलेल्या विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल त्यांना विश्‍वविद्यालयाच्या कुलगुरू प्रो. कुमुद शर्मा, कुलसचिव प्रो. आनन्‍द पाटील, विद्यार्थी कल्याण अधिष्ठाता प्रो. अवधेश कुमार व इतर शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने