ब्युरो टीम :निरोगी राहण्यासाठी तोंडाच्या स्वच्छतेची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. तोंडाची स्वच्छता ही तोंड, दात स्वच्छ ठेवण्याची गुरुकिल्ली आहे. विविध आजारापासून दूर राहण्यासाठी तोंडाची, दाताची स्वच्छता ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. ही स्वच्छता कशी ठेवावी, याबाबत आज आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.
पहा व्हिडिओ :वैष्णवी हगवणे प्रकरणात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिली महत्त्वाची माहिती
माणूस आपल्या कामात कितीही व्यस्त असला तरी तो स्वतःच्या तोंडाच्या स्वच्छतेची, दातांची काळजी सहज घेऊ शकतो. त्यासाठी अगदी वेगळा वेळ काढावा असं काही नाही. दातांमध्ये जेवणाचे कण अडकू न देणं, सकाळी आणि रात्री नियमीत दात घासणे, असे उपाय तो सहज करू शकतो. त्यामुळे नक्कीच फायदा होईल.
पहा व्हिडिओ : सुजय विखे पाटील यांच्याकडून अजित पवारांची पाठराखण
मौखिक आरोग्य चांगले राहण्यासाठी, ओरल केअर रुटीनला प्राधान्य द्यावे. नियमित ओरल केअर चेकअप करण्यासाठी डेंटिस्ट ला भेट द्यावी. तसेच तोंडाचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी दिवसातून दोनदा 2 मिनिटे ब्रश करा. तसेच दर 3 महिन्यांनी ब्रश बदला, कारण तो खराब होतो. दात स्वच्छ करण्यासाठी, फ्लॉसिंग करणे आवश्यक आहे.
फ्लॉसिंग म्हणजे नेमकं काय ?
फ्लॉसिंग ही दात खोलवर स्वच्छ करण्याची एक पद्धत आहे. जेवण करताना, एखादा पदार्थ खाताना दातांमध्ये अन्नाचे कण अडकतात. त्यामुळे तोंडात अनेक बॅक्टेरिया तयार होतात. दातांमध्ये अडकलेली घाण आणि अन्न काढून टाकण्यासाठी, दात पातळ धाग्याने स्वच्छ केले जातात, या पद्धतीला फ्लॉसिंग म्हणतात. स्मृतिभ्रंश, हृदयरोग आणि रक्ताच्या गुठळ्या तयार होणे या समस्या कमी करण्यासोबतच प्रजनन क्षमता वाढण्यास फ्लॉसिंगमुळे मदत होते.
टिप्पणी पोस्ट करा