ब्युरो टीम : भारत आणि पाकिस्तान यांच्या लष्करी अधिकाऱ्यांमध्ये फोनवरून चर्चा झाली असून दोन्ही देशांचे शस्त्रविरामाच्या मुद्द्यावर एकमत झाले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेत याबद्दलची माहिती दिली आहे.
पाकिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी भारताच्या डीजीएमआय यांच्याशी आज दुपारी ३.३५ वाजता फोनवरून चर्चा केली. दोघांमध्ये दोन्ही बाजूंकडील गोळीबार, जमिनी लष्करी कारवाई तसेच हवाई आणि समुद्री कारवाई भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून थांबवण्याबाबत एकवाक्यता झाली. याबाबतच्या सूचना दोन्ही बाजूंना देण्यात आल्या आहेत. १२ मे रोजी दुपारी १२ वाजता दोन्ही देशांचे डीजीएमओ चर्चा करतील, अशी माहितीही भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा