Health Benefits :घरच्याघरी तयार करा उसाचा रस, कसा? जाणून घ्या


ब्युरो टीम : उन्हाळ्यात थंड आणि गोड उसाचा रस हा खूपच चवदार लागतो, व आरोग्याच्यादृष्टीनं तो उपयुक्त असतो. पण बऱ्याचवेळा रसवंती गृहावर उसाच्या रसामध्ये टाकण्यासाठी वापरला जाणारा बर्फ हा शुद्ध पाण्याने बनवला आहे का? तसेच उसाचा रस ज्या काचेच्या ग्लासमध्ये दिला जातोय, तो ग्लास व्यवस्थित धुतला आहे का? याबाबतही मनात शंका येते. अशावेळी आरोग्याच्यादृष्टीने फायद्याचा ठरणाऱ्या उसाच्या रसामुळे आजारी तर पडणार नाही ना, अशा प्रश्न निर्माण होता. अशावेळी घरच्या घरी उसाचा रस तयार करून तो पिणं हे फायद्याचं ठरतं.

उन्हाळ्यात उसाचा रस पिण्यासाठी अनेकदा तुम्ही घराच्या बाहेर जात असाल. तसेच घराच्या बाहेर पडल्यानंतर सुद्धा बऱ्याचवेळा रस्त्याच्याकडेला असणाऱ्या रसवंती गृहावर जाऊन उसाच्या रसाचा आस्वाद घेण्याची तुमची इच्छा झाली असेल. पण तुम्हाला माहिती आहे का, तुम्ही घरच्याघरी सुद्धा उसाचा रस सहज तयार करू शकता. हे अशक्य वाटत असले, तरी प्रत्यक्षात उसाचा रस घरच्या घरी काढणे खूप सोपे आहे. ते कसे, जाणून घेऊ

घरच्याघरी असा बनवा उसाचा रस

सर्वप्रथम ताज्या उसाची साल काढा. आता उसाचे छोटे छोटे तुकडे करा. ते तुकडे ग्राइंडरमध्ये टाकून मिश्रण तयार करा. त्यानंतर तयार झालेले मिश्रण एका कापडात घेऊन त्या कापडाला गाठ बांधा. त्यानंतर एक पातीलं घेऊन ते कापड त्यावर धरून पिळावे, किंवा एका वाटीने कापडावर जोरात दाबावे. त्यामुळे उसाचा रस हा पातील्यात जमा होईल. अशाप्रकारे घरच्याघरी तुम्हाला उसाचा रस तयार करता येतो. त्यानंतर या रसात बर्फ घालून तुम्ही त्याचे सेवन करू शकता.

पहा व्हिडिओ : सरसंघचालक मोहन भागवत यांनी साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर नेमकं काय दिला भावनिक अभिप्राय


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने