health :डोकेदुखीच्या समस्येपासून दूर राहायचे आहे? मग हे वाचाच


ब्युरो टीम : भारतात 'योग' ही एक प्राचीन पद्धत आहे. योग केल्याने सुंदर जीवनशैली निर्माण होण्यास मदत होते. भारतीय संस्कृतीत योग या प्रकाराला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. त्यामुळेच नियमित योगासने करणे आरोग्यासाठी सुद्धा खूप फायदेशीर ठरते. उन्हाळ्यात सुद्धा डोकेदुखी, डोळ्यात जळजळ होणे आदी आरोग्यविषयक समस्यांपासून दूर राहण्यासाठी योग हे उपयुक्त ठरतात. त्यासाठी मात्र योग आसन करण्यात सातत्य हवे.

सध्या उन्हाची तीव्रता वाढत असून उन्हाच्या कडाक्यात घराबाहेर पडणे धोकादायक ठरू लागलं आहे. उन्हातून आल्यानंतर अनेकदा डोकेदुखी सुरू झाल्याची तक्रार केली जाते. तसेच थोडासा निष्काळजीपणा उष्माघातापासून निर्जलीकरणापर्यंतच्या गंभीर आरोग्य समस्यांचा धोका वाढवू शकतो. उन्हाळ्यात उष्णता आणि सूर्यप्रकाशामुळे मायग्रेनची समस्या वाढू शकते. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात डोकेदुखी कमी करण्यासाठी काही योगासने करणे फायदेशीर ठरते. 

उन्हाळ्यात डोकेदुखीचा त्रास वाढल्यास त्यावर मात करण्यासाठी पश्चिमोत्तनासनाचा नियमित सराव करावा. या आसनामुळे मन शांत होते आणि तणाव दूर होतो. तणाव हे मायग्रेनचे प्रमुख कारण आहे. या आसनामुळे तणाव कमी होऊ शकतो. त्यामुळे डोकेदुखी कमी करण्यासाठी हे अतिशय उपयुक्त असे आसन आहे.

सेतुबंधासन आहे फायदेशीर

उन्हाळ्यात नियमितपणे सेतुबंधासन योगासने केल्यास त्याचा फायदा होतो. सेतुबंधासनाच्या सरावाने रक्तदाब नियंत्रणात राहून मन शांत राहते. चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी सेतुबंधासन उपयोगी आहे. हे आसन नियमित केल्याने मेंदूकडे रक्त आणि ऑक्सिजन योग्य प्रमाणात पोहोचते. त्यामुळे उन्हाळ्यात सेतुबंधासन आसन नियमित करणे आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त आहे.

पहा व्हिडिओ : शिर्डीत साईबाबा दर्शन घेतल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला भावनिक अभिप्राय

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने