ब्युरो टीम : चहा पिताना अनेकांना सोबत काहीतरी खाण्यासाठी लागते. परंतु तुम्हाला माहितीये का, काही पदार्थ असे आहेत, जे चहासोबत खाल्ल्यानं ते शरीरासाठी आरोग्याच्या दृष्टीनं हानिकारक ठरतात. ज्याचे अनेक तोटे असून त्याचा शरीराला फार घातक त्रासही भोगावा लागतो. यामुळे आपली पचनक्रिया खराब होऊ शकते.
चहा घेतल्यानंतर तुम्हाला पोटा संबंधित समस्या निर्माण होत असल्यास, चहा सोबत दुसरा एखादा पदार्थ खाणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे शक्यतो चहा सोबत काही खाऊ नये, किंवा चहा सोबत नेमका कोणता पदार्थ खाणे टाळले पाहिजे? हे नेहमी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.
चला तर, चहासोबत नेमक्या कोणत्या पदार्थांचे सेवन करू नये, हे जाणून घेऊ.
फळे
जर तुम्ही सकाळी चहा घेणार असाल, व नाश्त्यांमध्ये फळांचा आहार घेत असाल, तर या दोन्हीमध्ये अंतर ठेवणे गरजेचे आहे.
लिंबाचा रस
चहा पिण्या आधी किंवा नंतर लगेच लिंबाचा रस पिऊ नका. त्यामुळे पोटाला सूज येऊ शकते. हे मिश्रण टाळणे फायद्याचे आहे.
पराठा
चहा सोबत पराठा तुम्ही सुद्धा अनेकदा खाल्ला असेल. पण काहीजणांना चहा व पराठा एकत्र खाण्यामुळे पचनाची समस्या उद्भवू शकते.
थंड पदार्थ
चहा सोबत थंड पदार्थांचे सेवन करणे योग्य नाही.
पहा व्हिडिओ : शिर्डीत साईबाबा दर्शन घेतल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला भावनिक अभिप्राय
टिप्पणी पोस्ट करा