Raid 2 : अजय देवगणचा बॉक्स ऑफिसवर धमाका!


ब्युरो टीम :
बॉलिवूड अभिनेता अजय देवगण याची प्रमुख भूमिका असणाऱ्या 'रेड 2' (Raid 2) चित्रपटाने 18 व्या दिवशी जबरदस्त कमाई केली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेल्या या थ्रिलर चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या विकेंडमध्ये चित्रपटाने पुन्हा एकदा जबरदस्त प्रदर्शन केले आहे. रिलीजच्या तिसऱ्या रविवारी 'रेड 2' ने धमाकेदार कमाई करत सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

रविवारी सुट्टीचा पुरेपूर फायदा घेत अजयच्या 'रेड 2' ने 6 कोटींचा कलेक्शन करत आपला गल्ला वाढवला आहे. चला तर मग, 'रेड 2' च्या ताज्या कलेक्शन रिपोर्टवर नजर टाकूया.

'रेड 2' चा बॉक्स ऑफिसवर धमाका

 'रेड 2' ने तिसऱ्या विकेंडवरही दमदार प्रदर्शन करत बंपर कमाई केली आहे. सैकनिल्कच्या रिपोर्टनुसार, रिलीजच्या 18 व्या दिवशी 'रेड 2' ने 6 कोटींची कमाई केली आहे. यामुळे चित्रपटाने एकूण 150 कोटींचा गल्ला जमवला आहे.

केलाय हा विक्रम 

गेल्या तीन दिवसांच्या अहवालानुसार, रविवारी चित्रपटाच्या कमाईने उच्चांक गाठला आहे. या कमाईसह 'रेड 2' ने बॉक्स ऑफिसवर आपली मजबूत पकड कायम ठेवली आहे. विक्की कौशलच्या 'छावा'नंतर 'रेड 2' ही या वर्षातील दुसरा सर्वाधिक कमाई करणारी हिंदी चित्रपट ठरला आहे.

अशी आहे कमाई

पहिला आठवडा - 98.89 कोटी

दुसरा आठवडा - 41.33 कोटी 

तिसरा विकेंड - 13 कोटी

एकूण  - 153 कोटी

पहा व्हिडिओ : शिर्डीत साईबाबा दर्शन घेतल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला भावनिक अभिप्राय


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने