IPL 2025 Suspended : भारत-पाक तणावामुळे 'बीसीसीआय'चा मोठा निर्णय, आयपीएल स्पर्धा स्थगित


ब्युरो टीम : आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या संबंधांमुळे बीसीसीआयने Ipl 2025 स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयपीएलचे पुढील सामने तूर्तास खेळवले जाणार नाहीत. आयपीएल 2025 चे आतापर्यंत ५७ सामने झाले असून १६ सामने बाकी आहेत. पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्समधील सामना रद्द करण्यात आला होता. त्यामुळे आज होणारा आरसीबी आणि लखनऊनमधील सामना होणार की नाही याबाबत शंका होती. मात्र आता बीसीसीआयने घेतलेल्या निर्णयामुळे संपूर्ण आयपीएल स्पर्धा तूर्तास थांबवण्यात आली आहे.


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने