विक्रम बनकर, अहिल्यानगर : खासदार निलेश लंके यांच्या पुढाकाराने रायरेश्वर गडावर वृक्षारोपण,स्वच्छता अभियान आणि गड संवर्धन मोहिमेचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. भर पावसात शेकडो कार्यकर्त्यांच्या सहभागाने पार पडलेली ही मोहीम गडकोटांच्या संवर्धनासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात आहे.
या वेळी खासदार लंके यांनी ‘आपला मावळा’ या नवीन सामाजिक संघटनेची घोषणा केली. या संघटनेची कार्यकारिणी लंके यांनी घोषित केली.संघटनेचे अध्यक्ष म्हणून रामेश्वर निमसे यांची तर सचिवपदी प्रा.सीताराम काकडे यांची निवड करण्यात आली.
पहा व्हिडिओ : सुजय विखे पाटील यांच्याकडून अजित पवारांची पाठराखण
खासदार लंके म्हणाले, 'स्वराज्यातील गड किल्ले हे छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारके आहेत .ते शिवरायांच्या गौरवशाली इतिहासाचे व पराक्रमाची साक्ष देत उभे आहेत.आपल्या या इतिहासाचे व गड किल्ल्यांचे जतन व संवर्धन करणे गरजेचे आहे.त्याच बरोबर “छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास जनतेपर्यंत पोहोचावा आणि त्यांच्या किल्ल्यांचा ठेवा सुस्थितीत राहावा, आपला ऐतिहासिक वारसा आपल्या भावी पिढीला समजावा यासाठी हा उपक्रम सुरू केला आहे. दर महिन्याच्या एका रविवारी वेगवेगळ्या गडांवर ही मोहीम राबवली जाणार आहे.”
मोहिमेदरम्यान कार्यकर्त्यांनी गड परिसरात स्वच्छता करत कचरा गोळा केला.रंगरगोटी केली.वड पिंपळ शिसम आवळा यासारख्या वृक्षांची लागवड केली.इलेट्रिक दिवे व सौर दिवे बसविले.पर्यावरण संरक्षणाचा आणि ऐतिहासिक वारशाचा संवर्धन करण्याचा संकल्प यावेळी सर्वांनी केला.
‘आपला मावळा’ संघटना गड-किल्ल्यांच्या संवर्धनासोबतच युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, इतिहासाची जाणीव आणि सामाजिक एकजुटीचे मूल्य रुजविण्यासाठी कार्य करणार आहे.
रायरेश्वर गड हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतलेला पवित्र गड असल्याने या मोहिमेला विशेष ऐतिहासिक महत्त्व लाभले.
छत्रपती शिवाजी महाराज की जय ,जय जिजाऊ जय शिवराय,जय भवानी, जय शिवाजी अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. गडप्रेमी, शिवप्रेमी आणि स्थानिक नागरिकांच्या या उत्स्फूर्त सहभागामुळे ही मोहीम अधिक प्रभावी आणि प्रेरणादायी ठरली.
या वेळी आपला मावळा संघटनेची खासदार लंकेंनी कार्यकारणी जाहीर केली
रामेश्वर निमसे - अध्यक्ष
सुधीर लाकुडझोडे- कार्याध्यक्ष
दौलत गांगड - उपाध्यक्ष
योगीराज गाडे - उपाध्यक्ष
सीताराम काकडे - सचिव
अमोल झेंडे - सहसचिव
अल्ताफ शेख - खजिनदार
पहा व्हिडिओ:
टिप्पणी पोस्ट करा