पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सर्व वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १०८ रुग्णवाहिकेसह प्रत्येक ग्रामीण रुग्णालयात रुग्ण वाहिका उपलब्ध आहे. याबरोबरच जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद़ही आहेत.
पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय रुग्णालयांमध्ये किमान महिनाभर पुरतील एवढ्या औषधांचा साठा आहे. आवश्यकता भासली, तर स्थानिक पातळीवर औषधे खरेदी केली जातात. पावसाळ्यात काही वेळेस सर्पदंशाच्या घटना घडतात. प्रत्येक शासकीय रुग्णालयात सर्पदंश प्रतिबंधक लशी उपलब्ध करून दिलेल्या आहेत. तसेच सर्पदंश झाल्यास करावयाचे प्रथमोपचार याविषयी आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
नागरिकांनी आरोग्याविषयी काही तक्रार असेल, तर तत्काळ जवळच्या शासकीय रुग्णालयात जावून आरोग्याची तपासणी करून घ्यावी. तसेच पावसाळ्यात जलविकार उदभवण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर पाणी शुद्ध राहील याची दक्षता घ्यावी. शक्यतो उकळून थंड केलेल्या पाण्याचा पिण्यासाठी वापर करावा.
- डॉ. चारुदत्त शिंदे, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक
-
टिप्पणी पोस्ट करा