Rain Alert : आज मुसळधार पावसाचा अंदाज! अहिल्यानगरसह 5 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट


विक्रम बनकर, अहिल्यानगर : राज्यातील विविध भागात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावस सुरु आहे. त्यातच सोमवारी (१९ मे) अहिल्यानगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा या पाच जिल्ह्यात मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. यादरम्यान विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

('मराठी PRINT' चा अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करा )

सोमवारपासून अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील पाच जिल्ह्यांसह घाट माथ्यांना मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

उत्तर कोकणातील काही ठिकाणी, तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात आणि घाट माथ्यावर विजांच्या कडकडाटासह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40-50 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. 

वादळी वाऱ्यांमुळे झाडं पडणे, विजेचे खांब कोसळून नुकसान होणे आणि वीज प्रवासात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असल्याने आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

('मराठी PRINT' चं अधिकृत YouTube  चॅनल Subscribe करा )

'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, सांगली, सोलापूर, संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, लातूर ,धाराशिव, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वाशिम, वर्धा, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पहा व्हिडिओ : शिर्डीत साईबाबा दर्शन घेतल्यानंतर सरसंघचालक मोहन भागवत यांनी दिला भावनिक अभिप्राय


0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने