ब्युरो टीम : खरेदीखत मध्ये तसेच उसनवार घेतलेल्या रक्कमेचे परतफेडीसाठी देण्यात आलेल्या ४.२५ लाख रुपयाचे प्रत्येकी दोन असे एकूण ८.५० लाख रुपयाचे धनादेश बाऊन्स झाल्याप्रकरणी सोहम कन्स्ट्रक्शनचे मालक रघुनाथ बाजीराव मोहिते यांच्यावर मे २०२३ मध्ये न्यायालयात दोन वेगवेगळे खटले दाखल करण्यात आले होते. या दोन्ही प्रकरणी सुनावणी होऊन फिर्यादी यास रक्कम देणे लागत नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट करुन मोहिते यांना दोन्ही चेक बाऊन्सच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे.
याप्रकरणी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम.पी पांडे साहेब (कोर्ट नं.१०) यांच्या न्यायालयात नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट अॅक्ट चे कलम १३८ प्रमाणे दोन फौजदारी खटले दाखल होते. सदर दोन्ही प्रकरणाची गुणदोषावर चौकशी करून न्यायालयाने आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी हा फिर्यादी यास रक्कम देणे लागत नाही, म्हणून आरोपी मोहिते यांना निर्दोष मुक्ततेचे २१ मे २०२५ रोजी आदेश दिले. आरोपीच्या वतीने अॅड. हाजी रफिक बेग, अॅड. रियाज रफिक बेग, अॅड. आयाज रफिक बेग व अॅड. फैजान मूर्तजा बेग यांनी काम पाहिले.
टिप्पणी पोस्ट करा