Ahilynagar crime :जामखेड येथे तरूणावर फायरिंग करणारे 6 आरोपी 24 तासाच्या आत जेरबंद


विक्रम बनकर, अहिल्यानगर : जामखेड येथे तरूणावर फायरिंग करणारे सहा आरोपी 24 तासाच्या आत जेरबंद करण्यात अहिल्यानगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. प्रभु रायभान भालेकर, (वय 33, रा.निपाणी, छत्रपती संभाजीनगर), नकुल विष्णु मुळे(वय 40, रा.खेर्डा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर), शरद अंकुशराव शिंदे (वय 38, रा.पुसेगाव, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर) गणेश गोविंद आरगडे (वय 30, रा.खंडाळा, ता.पैठण, जि.छत्रपती संभाजीनगर ), रावबहादुर श्रीधर हारकळ (वय 35, रा.सारासिध्दी सोसायटी, बीड बायपास, छत्रपती संभाजीनगर), सुशील ताराचंद गांगवे (वय 30, रा.पद्मपुरा, छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेली अधिक माहिती नुसार, 1 जून 2025 रोजी फिर्यादी आदित्य बबन पोकळे (वय 20, रा.पोकळेवस्ती, जामखेड, ता.जामखेड, जि.अहिल्यानगर) व साक्षीदार यांचे अनोळखी आरोपींसोबत रस्त्यांवर लघवी करण्याचे कारणावरून वाद झाले. यातुन आरोपींनी फिर्यादी व साक्षीदार यांना लाथाबुक्क्यांने मारहाण केली.तसेच जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांचे दिशेने तीन गोळया फायर केल्या त्यापैकी दोन गोळया हुकल्या व एक गोळी फिर्यादीचा मित्र कुणाल बंडू पवार (रा.पोकळेवस्ती, जामखेड) याचे पायास लागली.याबाबत जामखेड पोलीस स्टेशन गु.र.नं.293/2025 बीएनएस कलम 109, 115 (2), 352, 3 (5) सह आर्म ऍ़क्ट 3/25 प्रमाणे खुनाचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. 

जामखेड येथे फायरिंग करून झालेल्या गुन्हयांची प्राथमिक माहिती मिळताच पोलीस अधिक्षक,अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेस तात्काळ गुन्हयाचा तपास करणेबाबत आदेश दिले. त्यानुषंगाने पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि हेमंत थोरात, पोसई अनंत सालगुडे व पोलीस अंमलदार अतुल लोटके, शाहीद शेख, संदीप दरंदले, रोहित येमुल, किशोर शिरसाठ, गणेश धोत्रे, संतोष लोढे, फुरकान शेख, विजय ठोंबरे, सागर ससाणे, अमृत आढाव, रोहित मिसाळ, प्रशांत राठोड, भगवान धुळे अशांचे दोन पथक तयार करून गुन्हयातील अज्ञात आरोपीचा शोध घेणेकामी रवाना केले.  

दिनांक 02 जून2025 रोजी पथक गोपनीय व तांत्रीक विश्लेषणाच्या आधारे गुन्हयाचा तपास करत असताना सदरचा गुन्हा हा प्रभु रायभान भालेकर, रा.निपाणी, संभाजीनगर व त्याचे साथीदारांनी केला असून ते प्रवरासंगम, ता.नेवासा मार्गाने  किया सेल्टॉस व मारूती अशा कारमधुन जात असल्याची माहिती प्राप्त झाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने पंचासमक्ष प्रवरासंगम, ता.नेवासा येथे सापळा रचुन प्रभु रायभान भालेकर, नकुल विष्णु मुळे, शरद अंकुशराव शिंदे, गणेश गोविंद आरगडे, रावबहादुर श्रीधर हारकळ, सुशील ताराचंद गांगवे अशांना ताब्यात घेतले. 

पथकाने पंचासमक्ष ताब्यातील आरोपीकडून किया सेल्टॉस कार क्रमांक (एमएच-20-एफपी-6622) व मारूती सुझुकी कार क्रमांक (एमएच-20-जीके-5586) असे वाहन व आरोपी प्रभु रायभान भालेकर याने गुन्हयात वापरलेले लायसन्सचे पिस्टल, 1 राऊंड व 2 रिकाम्या पुंगळया असा मुद्देमाल जप्त केला.ताब्यातील आरोपींना विश्वासात घेऊन गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली असता आरोपी प्रभु रायभान भालेकर हा त्याचे वाढदिवसाच्या कार्यक्रमासाठी त्याचे साथीदारासह भूम जि.उस्मानाबाद येथे गेला होता .वाढदिवस झालेनंतर जामखेड मार्गाने जात असताना रस्त्याचे कडेला लघवी करण्याचे कारणावरून त्याने त्याचेकडील शस्त्र परवाना असलेल्या पिस्टलमधुन फायरिंग केल्याची माहिती दिली. 

ताब्यातील आरोपींना जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालासह जामखेड पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून, गुन्हयांचा पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन हे करीत आहेत. 

सदर कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने