विक्रम बनकर, अहिल्यानगर : सन १९७५ ते १९७७ मधील आणीबाणीच्या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या व्यक्तींना कारावास सोसावा लागलेल्या व्यक्तींचा बुधवार, २५ जून, २०२५ रोजी पंडित जवाहरलाल नेहरू सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय,अहिल्यानगर येथे सकाळी ११.३० वाजता सन्मान करण्यात येणार असल्याची जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.
देशात सन १९७५ ते १९७७ मध्ये लागलेल्या आणीबाणी कालावधीत लढा देताना अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यक्तींनी मिसा कायद्याखाली कारावास भोगलेला आहे. अशा व्यक्तींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे सन्मानपत्र देवून यथोचित गौरव करण्याचे शासनाने ठरविले आहे. जिल्ह्यातील या व्यक्तींचा बुधवार, २५ जून, २०२५ रोजी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे.
सचित्र माहिती प्रदर्शनाचे आयोजन
याच अनुषंगाने जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवार, दि. २५ जून २०२५ रोजी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या हस्ते या सचित्र माहिती प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात आणीबाणीच्या अनुषंगाने जिल्ह्यात घडलेल्या विविध घटना-घडामोडींची तसेच आणीबाणीविरोधी संघर्षात सहभागी झालेल्या विविध कार्यकर्ते-नागरिकांची छायाचित्रे व माहितीचा समावेश असणार आहे. या सन्मान सोहळ्यास व सचित्र माहिती प्रदर्शनास उपस्थित राहण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा