Amravati : 'सिनेमा सिनेमा खेळतांना' एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन

ब्युरो टीम: चित्रपट, नाटक, वेब सिरीज, न्यूज चॅनेल, या माध्यमामध्ये रोजगार, व्यवसाय, नोकरीच्या संधी साठी धडपड करणाऱ्या कलावंत तसेच विद्यार्थी यांना चित्रपट उद्योग क्षेत्राची तांत्रिक ओळख आणि निर्मितीचे पायाभूत प्रशिक्षण देण्यासाठी अमरावती स्पंदन परिवार बहुउद्देशीय संस्था द्वारा संचालित बिइंग आर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, अमरावती आयोजित एक दिवशीय "सिनेमा सिनेमा खेळतांना" कार्यशाळेचे आयोजन  रविवारी, 29 जून  रोजी बीइंग आर्टिस्ट अकादमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, अमरावती येथे केले आहे. या कार्यशाळेसाठी 28 जून पर्यंत नावनोंदणी करून निशुल्क कार्यशाळेत सहभागी होण्याचे आवाहन अकादमी  संचालिका  स्नेहा वासनिक यांनी केले आहे.

कार्यशाळेला प्रमुख उपस्थिती तथा मार्गदर्शक म्हणून संस्थेचे माजी विद्यार्थी व  मालिका दिग्दर्शक आणि अभिनेता योगेश डवरे ( प्रचिती सद्गुरू श्री गजाननाची, अबीर गुलाल ई.) आणि  तुला शिकवीन चांगलाच धडा, सुंदरा मनामधे भरली मालिकांचे  दिग्दर्शक आणि अभिनेता तेजल डहाणकर, तसेच सध्या माध्यम क्षेत्रात कार्यरत असणारे आणि अकॅडमीचे माजी विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे.

पहा व्हिडिओ : जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीतील पादुकांची पूजा

चित्रपट तसेच माध्यमाच्या रीतसर शिक्षणानंतर शासकीय संस्था, अशासकीय संस्था, सरकारी कार्यालये, खाजगी संस्थामधे करियरच्या संधी, तसेच  फेलोशीप्स, स्कॉलरशिप, अर्थ सहाय्य मिळविण्याचे विविध मार्ग आणि चित्रपट उद्द्योजकता जनजागृती करण्याच्या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून चित्रपट निर्मितीची प्रक्रीया,  निर्माता, कथा लेखन, दिग्दर्शन, अभिनय, छायाचित्रण, प्रकाश योजना,  संकलन, ध्वनी, कला दिग्दर्शन,  रंगभूषा, वेशभूषा, जाहिरात व प्रसिद्धी,  सेन्सॉर सर्टीफिकेशन, वितरण व्यवस्था,आर्थिक गुंतवणुक व मोबदला या सर्व विभागांची कार्य पद्धती  तसेच  सिनेमा किंवा चित्रपट म्हणजे काय? कला-व्यवसाय-उद्योग-करियर  म्हणून या क्षेत्राकडे बघण्याचा दृष्टीकोन कसा असावा? यावर चर्चात्मक मार्गदर्शन करण्यात येणार आहे.  तसेच निवडक लघुपटांचे प्रदर्शन आणि चर्चा करण्यात येणार आहे.

पहा व्हिडीओ : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा

सामाजिक माध्यमांच्या आकर्षणामुळे तसेच सिनेमा क्षेत्राचा रीतसर अभ्यास नसल्यामुळे आजचा युवक भरकटत आहे. म्हणून निशुल्क "सिनेमा सिनेमा खेळतांना" या एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन बिइंगआर्टिस्ट अकॅडेमी ऑफ फिल्म अँड थिएटर आर्टस्, अमरावतीद्वारे करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी 9324363600/ 9518381132 या नंबर वर संपर्क करून 28 जून पर्यत नावनोंदणी करून कार्यशाळेला उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष पंकज धंदर यांनी केले आहे.

पहा व्हिडिओ : चला हवा येऊ द्या फेम अभिनेते योगेश शिरसाट यांची प्रेरणादायी मुलाखत 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने