ब्युरो टीम: राज्यातील 20 जिल्हयात राबविण्यात आलेल्या Up Scaling Aapda Mita या प्रशिक्षणाचे यश विचारात घेऊन जिल्हा क्रिडा स्टेडियम, बीड येथे दि. 6 जून 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता “आपदा मित्र प्रशिक्षण कार्यक्रम” राबविण्यात येणार आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये सहभागी उमेदवारांना नैसर्गिक आपत्तीचा सामना कशाप्रकारे करावा? याबाबतचे प्रशिक्षण एनडीआरएफ चे कुशल तज्ज्ञ प्रशिक्षक यांच्यामार्फत जिल्हा क्रिडा स्टेडियम बीड येथे विनामुल्य देण्यात येणार आहे. तसेच प्रशिक्षणा दरम्यान सहभागी उमेदवारांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभाग नोंदविणा-या प्रशिक्षणार्थी यांना 12 दिवसांचे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आपत्ती व्यवस्थापन किट व प्रमाणपत्र वाटप केले जाणार आहे. या प्रशिक्षाणामध्ये बीड मधील नागरिक, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट, सामाजिक संस्था स्वयंसेवक, आशा, अंगणवाडीसेविका, होमगार्ड, पोलीस, खाजगी सुरक्षा रक्षक, शासकीय-निमशासकीय कर्मचा-यांनी सहभाग नोंदवावा असे, आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यांनी केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा