Ahilyanagar :सर्वसाधारण करावरील सवलत काळात महानगरपालिकेची विक्रमी २७ कोटींची वसुली

विक्रम बनकर, अहिल्यानगर : महानगरपालिकेने एप्रिल ते जून या सर्वसाधारण करावरील सवलत कालावधीत या वर्षी विक्रमी २७ कोटींची वसुली केली आहे. ३९५१८ मालमत्ताधारकांनी या सवलतीचा लाभ घेऊन कराचा भरणा केला आहे. नियमित कर भरून शहराच्या विकासात हातभार लावणाऱ्या करदात्यांचे महानगरपालिकेकडून आभार व्यक्त करण्यात आले आहेत. तसेच, १ जुलैपासून म्हणजेच आजपासून मालमत्ता करावर २ टक्के दंड म्हणजेच शास्ती आकारणी सुरू करण्यात आल्याची माहिती आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी दिली.

वाचा : इतिहास घडला! पिंपरी चिंचवड महापालिकेची ९० दिवसांत ५२२ कोटींची कर वसुली!

महानगरपालिकेने एप्रिल व मे महिन्यात संकलित करावर १० टक्के सवलत दिली होती. २३४७८ नागरिकांनी व मालमत्ताधारकांनी या योजनेचा लाभ घेऊन कर भरला. त्यानंतर जून महिन्यात १६०४० मालमत्ताधारकांनी ८ टक्के सवलतीचा लाभ घेऊन कर जमा केला. या सर्व मालमत्ताधारकांनी जमा केलेल्या २८.१३ कोटींमध्ये ८६.३२ लाखांची सवलत देण्यात आली असून, २७.२७ कोटी रुपयांचा प्रत्यक्ष कर महानगरपालिकेत जमा झाला आहे. 

वाचा :नवी मुंबई महानगरपालिकेचे 366.80 कोटींचे विक्रमी करसंकलन !

महानगरपालिकेने कराच्या वसुलीसाठी यंदा जनजागृतीवर अधिक भर दिला होता. त्यामुळे मागील वर्षीपेक्षा तीन कोटींनी अधिक कर जमा झाला आहे. यापूर्वी एप्रिल ते जून महिन्यात २२ कोटी, २४ कोटी रुपये कर वसुलीची नोंद झाली होती. यावर्षी वसुलीचा नवा विक्रम महानगरपालिकेने नोंदवला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी कराचा भरणा केलेला नाही त्यांच्यावर दरमहा २ टक्के शास्ती आकारणी सुरू करण्यात आली आहे. अधिकचा दंड टाळण्यासाठी मालमत्ताधारकांनी तत्काळ कराचा भरणा करावा. लवकरच मोठ्या थकबाकीदारांवर महानगरपालिकेकडून कारवाई सुरू करण्यात येणार असल्याचे आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी स्पष्ट केले.

पहा व्हिडिओ : राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद 

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने