ब्युरो टीम : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या एम. ए. (शिक्षणशास्त्र) या अभ्यासक्रमास 'दूरस्थ अध्ययन' माध्यमातून शैक्षणिक सत्र जुलै - ऑगस्ट 2025 करिता प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया १० जुलैपासून सुरु झाली आहे.
अहिल्यानगर येथे या अ अभ्यासक्रमाचे केंद्र विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) संचलित प. पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालय,केडगाव देवी रोड येथे आहे.
या अभ्यासक्रमासाठी https://unipune.ac.in/SOL/ या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश अर्ज व शुल्क भरावे लागेल. ऑनलाईन प्रवेश अर्ज व शुल्क भरण्याची अंतिम मुदत २५ ऑगस्ट पर्यंत आहे. तर, अभ्यासकेंद्रावर प्रवेश अर्ज जमा करण्याची अंतिम मुदत २६ ऑगस्ट २०२५ आहे.
अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी शिक्षणशास्त्र महाविद्यालय परीक्षा विभाग प्रमुख डॉ. प्रा. लोखंडे गोकुळदास दत्तात्रय यांच्याशी संपर्क करता येईल.
पहा व्हिडिओ : राजकारणात आमची पीएचडी झालीय, डॉ. सुजय विखे पाटील यांचे वक्तव्य
टिप्पणी पोस्ट करा