ब्युरो टीम : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक, आद्य सरसंघचालक प. पू. डॉ. केशव बळीराम हेडगेवार, तसेच, व्दितीय सरसंघचालक प. पू. माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी, तृतीय सरसंघचालक मधुकर दत्तात्रेय देवरस ऊर्फ 'बाळासाहेब देवरस' या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पहिल्या तीन सरसंघचालकांचा जीवनपट मांडणाऱ्या 'संघ गंगा के तीन भगीरथ' या नाटकाला सावेडी, अहिल्यानगर येथील नाट्यरसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शतकपूर्ती केलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वाटचालीतील अनेक महत्त्वाचे टप्पे या नाटकातील जिवंत प्रसंगांमधून मांडण्यात आले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दीनिमित्त 'शताब्दी संघ यात्रा' या विशेष नाट्यप्रयोगांच्या मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे. या मालिकेअंतर्गत 'संघ गंगा के तीन भगीरथ' या नाटकाचे महाराष्ट्रात सलग 15 प्रयोग विविध शहरांमध्ये होणार आहेत. त्यांची सुरुवात खामगाव, बुलढाणा येथील प्रयोगापासून झाली होती. त्यानंतर अहिल्यानगर येथे या नाटकाचा प्रयोग बुधवार, दि. 2 जुलै रोजी आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर येथील माऊली सभागृह, सावेडी याठिकाणी हा नाट्यप्रयोग झाला.
विचार भारती आयोजित, विश्वराज सहयोगाने दोन अंकी हिंदी नाटक 'संघ गंगा के तीन भगीरथ' 'शताब्दी संघ यात्रा' मार्गदर्शक रविंद्र भुसारी, लेखक श्रीधर गाडगे, निर्देशक संजय पेंडसे, निर्माती सारिका पेंडसे, नेपथ्य सतीश पेंडसे, संगीत डॉ. भाग्यश्री चिटणीस, निर्मिती सहाय्य ॲड. रमण सेनाड, निलीमा बावणे, अरुणा पुरोहित, प्रमुख पाहुणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक मा. नानासाहेब आण्णाजी जाधव, विचार भारती सदस्य राजाभाऊ उर्फ रवींद्र गणेश मुळे, वाल्मीकराव उर्फ पुरुषोत्तम कुलकर्णी, हिराकांत अनंत रामदासी, उदयकुमार अरुण भणगे, रविंद्र बारस्कर, अशोकराव गायकवाड, राहुल गांधी, अंकुश गोळे, सुनिल नागोरी, मनोज झंवर, महेंद्र जाखेटे, सुधीर लांडगे, योगेश गोरे, निळकंठ ठाकरे, निलेश लोढा, विशारद पेटकर, वैद्य विलास जाधव, डॉ. डिडवाणीया, बाबासाहेब वाकळे, अनिल मोहिते, महेंद्रभाई चंदे, डॉ. कृष्णा देहाडराय, कुलदीप कुलकर्णी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. नाटकातील विविध प्रसंगांना नाट्यरसिकांना उत्तम दाद दिली.
पहा व्हिडिओ
टिप्पणी पोस्ट करा