ब्युरो टीम : अहिल्यानगर शहरातील केडगाव उपनगरातील विद्या प्रतिष्ठान (महाराष्ट्र) संचलित प.पू. डॉ. हेडगेवार शिक्षण प्रतिष्ठानचे शिक्षणशास्त्र महाविद्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन शिक्षणशास्त्र महाविद्यालय विभाग प्रमुख प्रा. डॉ. शर्मिला पारधे, प्रा. डॉ. अविनाश भांडारकर, प्रा. डॉ. प्रदीप शेळके, प्रा. विलास पांढरे, प्रा. विशाल जाधव यांच्या हस्ते करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विद्यार्थी शिक्षिका अंजली हराळ तर प्रमुख पाहुणे कुलदीप कुलकर्णी होते. विद्यार्थी शिक्षिका आकांक्षा पांडुळे, दिक्षा घोडके, साक्षी रायबोले, खुशबू शहारे, कार्तिका काकडे, जुही कुमारी यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
सूत्रसंचालन काजल कोठाळे यांनी केले. तर आभार पृथ्वीराज लोटके र यांनी मानले. कार्यक्रमास बी. एड. चे विद्यार्थी शिक्षक/शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.
टिप्पणी पोस्ट करा