अशा वेळी जास्त पाणी पिणे टाळा
लघवीचा रंग पहा
जेव्हा एखादी व्यक्ती जास्त पाणी पिते, तेव्हा त्याला वारंवार लघवी येते. यामुळे रात्रीच्या वेळी झोपेत अडथळा निर्माण होतो. तुम्ही योग्य प्रमाणात पाणी पित आहात की नाही, हे जाणून घेण्यासाठी तुमच्या लघवीचा रंग पहा. लघवीचा रंग पांढरा असेल, तर पाण्याचे प्रमाण योग्य असते, व लघवी पिवळी होत असेल तर समजून घ्या की तुम्हाला जास्त पाणी पिण्याची गरज आहे.
या अवयवांसाठी जास्त पाणी पिणे घातक
ज्या व्यक्ती जास्त पाणी पितात, त्यांना वाटतं असते की याचा खूप फायदा होईल. पण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणे चुकीचे आहे. यामुळे किडनी, हार्ट आणि लिव्हरचे काम वाढते, व हे अवयव खराब होण्याची शक्यता असते.
व्यायामानंतर लगेच पाणी पिऊ नका
स्वत:ला फिट ठेवण्यासाठी अनेकजण व्यायाम करतात. पण व्यायामानंतर लगेच पाणी पिऊ नये. कारण व्यायामानंतर भरपूर घाम निघतो, ज्यामुळे शरीरातून इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात. जर ते जास्त प्रमाणात बाहेर पडले, तर हे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे व्यायामानंतर तहान लागल्यास नारळपाणी, लिंबूपाणी किंवा फळांचा रस योग्य प्रमाणात पिऊ शकता.
तर पचनक्रियेत समस्या उद्भवू शकते
जेवणानंतर जास्त पाणी पिणे टाळावे. अन्यथा पचनक्रियेत समस्या उद्भवू शकतात. कारण जेवणानंतर लगेचच अनेक प्रकारचे पाचक आम्ल तयार होत असतात. ते जास्त पाणी प्यायल्यानं कमकुवत होऊ शकतात.
टिप्पणी पोस्ट करा