Pune : 'मेरा रेशम मेरा अभिमान' अंतर्गत कार्यशाळा संपन्न

ब्युरो टीम: भारत सरकारच्या केंद्रीय रेशीम मंडळ अंतर्गत संपूर्ण भारतभर "मेरा रेशम मेरा अभिमान" अभियान राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच आंबेगाव गटविकास अधिकारी अर्चना कोल्हे  यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा रेशीम कार्यालय पुणे व केंद्रीय रेशीम मंडळ बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय" मेरा रेशम मेरा अभिमान "अंतर्गत रेशीम कार्यशाळा संपन्न झाली. 

 या कार्यशाळेस केंद्रीय रेशीम मंडळ बारामतीचे डॉ. सुनील राठोड, श्रीमती निता डांग, जिल्हा रेशीम कार्यालयाचे रेशीम विकास अधिकारी  संजय फुले,आंबेगाव तालुक्याचे रेशीम समूह प्रमुख  आर टी पाटील, आंबेगाव तालुका ग्रामपंचायत अधिकारी संघटना अध्यक्ष  अनिल टेमकर, ग्रामरोजगार सहाय्यक संघटना अध्यक्ष सचिन पवार सहाय्यक कार्यक्रम अधिकारी श्रीमती पुष्पलता डोके उपस्थित होते. 

केंद्रीय रेशीम मंडळ बारामती कार्यालयाचे शास्त्रज्ञ डॉ.सुनील राठोड यांनी रेशीम शेतीचा इतिहास , रेशीमचे प्रकार,उत्पादन ,तुती लागवड ,कीटक संगोपन ,कोष उत्पादन, कोश विक्री इत्यादी बाबत सखोल माहिती पीपीटीच्या माध्यमातून उपस्थितांना दिली तसेच शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांचे डॉ.राठोड यांनी निरसन केले.शासनाच्या रेशीम योजनांची माहिती रेशीम विकास अधिकारी संजय फुले यांनी दिली. मेरा रेशम मेरा अभिमान या अंतर्गत सुरू असलेल्या अभियानामुळे रेशीम शेती उद्योग वाढीस निश्चितच गती मिळेल तसेच आंबेगाव तालुक्यात रेशीम शेती उद्योगाच्या वाढीस मोठा वाव असून रेशीम शेतीतून एकरी लखपती झालेले असंख्य शेतकरी पुणे जिल्ह्यात असल्याने व रेशीम उद्योग सुरू करण्यासाठी शासकीय अनुदानही उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रेशीम शेती करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन याप्रसंगी तालुक्याचे गटविकास अधिकारी श्रीमती अर्चना कोल्हे  यांनी केले.या कार्यशाळेस आंबेगाव तालुक्याचे तहसीलदार संजय नागटिळक यांचे विशेष सहकार्य लाभले.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने