ब्युरो टीम : धकाधकीच्या जीवनशैलीचा सर्वात मोठा फटका हा व्यक्तीच्या आरोग्याला बसतोय. अनेकदा व्यस्त लाईफस्टाईल आरोग्यावर विपरीत परिणाम करते. खरतर निरोगी शरीरासाठी पौष्टिक व संतुलित आहार खूप महत्वाचा आहे. त्यातही आरोग्यावर सर्वाधिक परिणाम तुमच्या रात्रीच्या जेवणाचा अर्थात डिनरचा होतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, 'सकाळचा नाश्ता जड असावा तर रात्रीचे जेवण अगदी हलके असावे. कारण यामुळे पचनक्रिया योग्य राहते. रात्रीच्या वेळी जड अन्न खाल्ल्यानं पचनाच्या समस्या उद्भवतात. तसेच रात्रीच्या जेवणाला उशीर होता कामा नये. रात्रीचे जेवण आणि झोपण्याच्या वेळेत किमान तीन तासांचे अंतर असावे. रात्रीच्या जेवणात पोळी, डाळ, कोशिंबीर आणि पालेभाज्यांचा समावेश असावा. फायबरचे प्रमाण पालेभाज्यात जास्त असते. रात्री पालेभाज्या खाल्ल्यानं आरोग्य आणि पचनसंस्था दोन्हींना फायदा होतो. रात्री तांदळाची खिचडी, डाळीचे सूप, व्हेजिटेबल सॅलड, ओट्स खाणे उत्तम आहे. कारण ते सहज पचते.'
चहा, कॉफी डिनरनंतर अजिबात नको
बऱ्याचदा तुम्ही काम करताना चहा किंवा कॉफी पित असाल. पण रात्रीच्या जेवणानंतर चहा, कॉफी प्यायल्यानं झोप येण्यास समस्या येते. कारण यामध्ये कॅफिन असते, व ज्यामुळे तुमची झोप उडते. अशा वेळी हे टाळले पाहिजे.
टिप्पणी पोस्ट करा