ब्युरो टीम : आज श्रावणी सोमवार आहे. या दिवशी भाविक विधीवत भगवान शंकराची पूजा करतात. शिवमंदिरांमध्ये श्री शिवलिंगाचा जलाभिषेक केला जातो, रुद्राभिषेकही केला जातो. पवित्र नद्यांचे पाणी शिवलिंगाला अर्पण केलं जातं. श्रावण महिन्या व्यतिरिक्त तुम्ही वर्षभर देखील शिवलिंगाची पूजा करू शकता. पण तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिना हा भगवान शंकराचा आवडता महिना असल्यानं या महिन्यातील शिवपूजेचं विशेष महत्त्व आहे. चला तर, याबाबत शिवपुराणात काय सांगण्यात आलंय, ते जाणून घेऊ.
शिवलिंग पूजेचे फायदे
शिवपुराणानुसार भगवान शंकराने ब्रह्म देव आणि भगवान विष्णूला सांगितले होते की, लिंगाच्या रूपात प्रकट होऊन ते खूप मोठे झाले. त्यामुळे भूतळ ‘लिंग स्थान’ या नावानं प्रसिद्ध झाले. ज्यामुळे भाविक त्याची पूजा करू शकतील, व पूजा केल्यानं हे अनंत ज्योतिस्तंभ किंवा ज्योतिर्मय लिंग खूपच लहान होईल,’ शिवपुराणात असं सांगण्यात आलं आहे की, ‘ज्योतिर्मय लिंग सर्व प्रकारचे भोग आणि मोक्ष प्रदान करण्याचे एकमेव साधन आहे. त्याचे दर्शन, स्पर्श आणि ध्यान भाविकांना जन्म-मृत्यूच्या दु:खापासून मुक्त करते. ज्या ठिकाणी शिवलिंगाचे दर्शन झाले ते ठिकाण अरुणाचल म्हणून ओळखले जाईल, जिथे मोठी तीर्थक्षेत्रे दिसतील. तेथे मोक्ष प्राप्त होईल.’
काय आहे शिवलिंगाचे महत्व
शिवपुराणानुसार प्रत्येक व्यक्तीसाठी कीर्तन, श्रवण आणि मनन करणे सोपं नसते. त्यासाठी योग्य गुरूची आवश्यकता असते. गुरूंच्या मुखातून येणारे शब्द माणसाच्या शंकांचे निरसन करतात. गुरू ज्या प्रकारे भगवान शंकराच्या तत्त्वाचं वर्णन करतात, तसेच भगवान शंकराचे स्वरूप, तत्वज्ञान, गुण इत्यादींचं दर्शन माणसाला होतं असते. तरच भक्ताला कीर्तन करता येतं. पण असं करणे शक्य नसल्यास भगवान शंकराची मूर्ती किंवा शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करावी. असं केल्यानं व्यक्तीला उत्तम लाभ मिळतो. भगवान शंकराच्या कलात्मक मूर्तीची पूजा करण्याची आज्ञा वेदांमध्येही देण्यात आलीय. पण तुम्हाला माहिती आहे का, इतर देवी-देवतांच्या मूर्तींची पूजा केली जाते, मात्र भगवान शंकराची मूर्ती आणि शिवलिंग या दोन्हींची पूजा करण्यात येते. मुळात शिवलिंगाचे स्वरूप भगवान शंकाराच्या ब्रह्मरूपाची जाणीव करून देते. शिवलिंग हे भगवान शंकराचे रूप आहे.
टिप्पणी पोस्ट करा