HSRP : वाहनांना HSRP नंबर प्लेट बसविण्याची मुदत 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत वाढवली

ब्युरो टीम : वाहनांची सुरक्षितता, नंबर प्लेटमधील छेडछाड व बनावटगिरी रोखणे तसेच रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख सोपी होण्यासाठी HSRP (High Security Registration Plate) नंबर प्लेट बसविणे अनिवार्य करण्यात आले आहे.

मूळतः 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना 15 ऑगस्ट 2025 पर्यंत HSRP नंबर प्लेट बसविणे बंधनकारक होते. परंतु अनेक वाहनांना अद्याप प्लेट बसविलेली नसल्याने परिवहन आयुक्त कार्यालयाने 30 नोव्हेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे.

महत्वाची माहिती –

  • 1 एप्रिल 2019 पूर्वीची सर्व वाहने HSRP नंबर प्लेटशिवाय वैध मानली जाणार नाहीत.
  • अंतिम मुदत : 30 नोव्हेंबर 2025

न बसवल्यास पुढील कामकाज थांबवले जाईल –

  • मालकी हस्तांतरण
  • RC मध्ये पत्ता बदल
  • वित्तीय बोजा चढविणे/उतरविणे
  • डुप्लिकेट RC देणे
  • NOC जारी करणे
  • वाहनांमध्ये बदल नोंदवणे

ऑनलाइन अर्जासाठी संकेतस्थळ :

👉 maharashtrahsrp.com

👉 transport.maharashtra.gov.in

जर वाहनमालकाने HSRP प्लेट बसविण्यासाठी नियोजित तारीख घेतली असेल, तर त्याची पावती RC सोबत जोडल्यास वाहनासंबंधित इतर कामे सुरु ठेवता येतील.

तरी सर्व वाहनधारकांनी 30 नोव्हेंबर 2025 पूर्वी HSRP नंबर प्लेट बसविणे आवश्यक आहे. ही मुदत अंतिम असल्याने तातडीने अर्ज करून प्लेट बसवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने