Kolhapur :पंचगंगा नदी पात्राबाहेर

ब्युरो टीम : गेल्या चार - पाच दिवसांपासून कोल्हापूर जिल्हयात सर्वदूर पावसाची संततधार सतत सुरू आहे . त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे . काही ठिकाणी जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे राज्य रस्ते बंद आहेत तर काही ठिकाणी नद्या ,ओढे आणि .नाले यांच्या पात्राबाहेर पाणी आले आहे .आज पंचगंगा नदी पुन्हा एकदा पात्राबाहेर आली .

दुपारी 12 वाजताच्या दैनंदिन पाणी पातळी अहवालानुसार राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 36 फूटावर पोहचली आहे . नदीची 39 फूट ही इशारा पातळी आहे . कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 80 बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत . पंचगंगा नदीची 43 फुट इतकी धोक्याची पातळी आहे . पावसाचा जोर आणखीन वाढल्यास पंचगंगेच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही .आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे तसेच नदी काठच्या नागरिकांनी सतर्क रहावे , असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे .

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने