ब्युरो टीम : सांगली जिल्ह्यातील प्रमुख वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 32.12 टी.एम.सी. पाणीसाठा झाला असून धरणाची एकूण साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी आहे. पाणीसाठ्याच्या तुलनेत हे प्रमाण समाधानकारक असल्याची माहिती जलसंपदा विभागाने दिली आहे.
जिल्ह्यासह परिसरातील इतर महत्त्वाच्या धरणांमध्ये देखील चांगला साठा नोंदविण्यात आला आहे. कोयना धरण 98.57 (105.25), धोम 13.21 (13.50), कन्हेर 9.79 (10.10), धोम बलकवडी 3.99 (4.08), उरमोडी 9.79 (9.97), तारळी 5.52 (5.85), राधानगरी 8.36 (8.36), दूधगंगा 23.49 (25.40), तुळशी 3.42 (3.47), कासारी 2.59 (2.77), पाटगाव 3.72 (3.72) तर कर्नाटकमधील अलमट्टी धरण 113.76 (123 टी.एम.सी.) एवढा पाणीसाठा नोंदविला गेला आहे.
दरम्यान, विविध धरणांमधून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सुरू असलेल्या विसर्गाचा वेग देखील लक्षणीय आहे. कोयना 53,300, धोम 8,671, कन्हेर 4,204, धोम बलकवडी 4,303, उरमोडी 2,719, तारळी 2,744, वारणा 24,630, राधानगरी 11,500, दूधगंगा 7,600, तुळशी व कासारी प्रत्येकी 1,500, पाटगाव 1,462, हिप्परगी बॅरेज 74,250 तर अलमट्टी धरणातून तब्बल 1 लाख 50 हजार क्युसेक्स इतका विसर्ग सुरू आहे.
जिल्ह्यातील नद्यांवरील पाणीपातळीही वाढत असल्याचे दिसून येत आहे. आयर्विन पूल, सांगली येथे पाणीपातळी 18.9 फूट (इशारा पातळी 40 फूट) तर अंकली पूल, हरिपूर येथे पातळी 20.7 फूट (इशारा पातळी 45.11 फूट) नोंदविण्यात आली आहे.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 22.5 मि.मी. पाऊस झाला असून सर्वाधिक पर्जन्यमान शिराळा तालुक्यात 59.1 मि.मी. इतका नोंदविला आहे. तालुकानिहाय आकडेवारी पुढीलप्रमाणे – मिरज 22 (295.8), जत 13.3 (273.8), खानापूर-विटा 15.9 (236.3), वाळवा-इस्लामपूर 30.7 (424.8), तासगाव 17.5 (295.5), शिराळा 59.1 (1004), आटपाडी 11.5 (262.8), कवठेमहांकाळ 13.1 (273.2), पलूस 18.6 (365.9) व कडेगाव 16.4 (287.4).
या पर्जन्यमानामुळे धरणसाठा वाढीस लागला असून नदीपात्रातील पाणीपातळ्याही स्थिरावल्या आहेत. नागरिकांनी नदीकाठच्या भागात अनावश्यक वावर टाळावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
टिप्पणी पोस्ट करा