या मोहिमेदरम्यान किल्ल्यावरील झाडाझुडपं व कचरा हटविण्यात आला. तसेच पर्यटक व भाविकांना स्वच्छतेचा संदेश मिळावा यासाठी संघटनेच्या वतीने किल्ल्याच्या ठिकठिकाणी कचरा पेट्या व नामफलक लावण्यात आले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांची विशेष उपस्थिती लाभली.
‘आपला मावळा संघटने’चे अध्यक्ष निलेश लंके म्हणाले, “शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा त्यांनी जो गडकिल्ल्यांचा ठेवा ठेवला आहे, त्याचं जतन व संवर्धन होणं अधिक महत्त्वाचं आहे. गडकोट हा आपला इतिहास, आपल प्रेरणास्थान आहे त्यांना जतन करणे आपल्या सर्वांचीच नैतिक जबाबदारी आहे.
संघटनेच्या माध्यमातून आतापर्यंत विविध गडांवर संवर्धन उपक्रम राबविण्यात आले असून, पुढील काळातही ही मोहीम सातत्याने सुरू राहणार असल्याचे लंके यांनी सांगितले.
टिप्पणी पोस्ट करा