Ahilyanagar : प्रा. राम शिंदे यांचा फोटो वगळला, जामखेडमध्ये आंदोलन

विक्रम बनकर, अहिल्यानगर : अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वार्षिक ताळेबंद अहवाल पुस्तिकेत राज्याचे विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचा फोटो  वगळ्याबद्दल प्रा. शिंदे यांच्या समर्थकांनी संताप व्यक्त करीत आज जामखेड येथे जिल्हा बँक प्रशसनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जामखेड येथील बँकेच्या कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले.

पहा व्हिडिओ : आमदार संग्राम जगताप प्रशासनाच्या विरोधात आक्रमक, कारण...

यावेळी जेष्ठ नेते मधुकर राळेभात,  तालुकाध्यक्ष बापुराव ढवळे, शहराध्यक्ष संजय काशिद, भगवान मुरूमकर, मार्केट कमिटीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती नंदकुमार गोरे, मार्केट कमिटीचे संचालक सचिन घुमरे, मार्केट कमिटीचे माजी सभापती गौतम उतेकर, नारायण जायभाय, डॉ. गणेश जगताप, पांडुरंग उबाळे, उदयसिंह पवार, तात्याराम पोकळे, राहुल बेदमुथा, राजेंद्र ओमासे आदी उपस्थित होते. 

जिल्हा बँकेने वार्षिक ताळेबंद अहवाल नुकताच प्रसिध्द केला आहे. बँक प्रशासनाने या अहवालात सभापती प्रा. राम शिंदे यांचा फोटो प्रसिध्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रा. राम शिंदे यांच्या समर्थकांनी  जिल्हा बँक प्रशासनाचा निषेध केला.

आंदोलनात नेमकं काय झालं?जाणून घेण्यासाठी पहा व्हिडिओ

0/Post a Comment/Comments

थोडे नवीन जरा जुने